Taurus Weekly Horoscope 06 To 12 January 2025 : हिंदू कॅलेंडरनुसार, जानेवारी महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा वृषभ (Taurus) राशीसाठी नेमका कसा असणार आहे? वृषभ राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा वृषभ राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)


लव्ह लाइफमध्ये काही अडचणी निर्माण होतील, ज्या तुम्हाला हुशारीने सोडवाव्या लागतील. लाँग डिस्टन्स रिलेशनमधील लोकांमध्ये वाद होऊ शकतात. वाद सोडवण्यासाठी तुम्हाला दोघांना एकमेकांशी बोलणं आवश्यक आहे. आपलं म्हणणं मांडताना थोडं सावध रहा, तुमच्या एका शब्दामुळे तुमच्या प्रियकराच्या भावना जुखावल्या जाऊ शकतात. यामुळे ब्रेकअपही होऊ शकतो. जे कुठे फिरायला गेले आहेत, त्यांनी फोनवरुन जोडीदाराशी संपर्कात राहिलं पाहिजे. काहीजण कुटुंबाकडून मान्यता मिळवण्यासाठी त्यांच्या पालकांशी त्यांच्या नातेसंबंधावर चर्चा करू शकतात.


वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)


कामाच्या ठिकाणी स्वत:ला शिस्त लावा, यामुळे तुम्हाला कामात चांगले परिणाम मिळतील. वरिष्ठ तुमच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करतील. तुम्हाला एकाच वेळी अनेक कामं करावी लागतील. कार्यालयीन राजकारणाचा तुमच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होऊ देऊ नका. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या नोकरीच्या संदर्भात प्रवासही करावा लागू शकतो. तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची हीच वेळ आहे. तुम्ही एका वेळी अनेक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू शकता. काही भाग्यवान लोक परदेशातही आपला व्यवसाय वाढवतील.


वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)


या आठवड्यात तुमचं चांगलं उत्पन्न असूनही आर्थिक बाबतीत किरकोळ समस्या जाणवतील. तुम्हाला कामाचा चांगला मोबदला मिळणार नाही. तुम्हाला तुमच्या खर्चाबाबत सावध राहावं लागेल. पैशांबाबत मित्र किंवा भावंडांशी वाद होऊ शकतात. भावंडांसोबत किंवा मित्रासोबत चालू असलेले आर्थिक वाद सोडवा. तुम्हाला एखाद्याकडे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. या आठवड्यात तुम्ही नवीन कार देखील खरेदी करू शकता.


वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)


पुढच्या 7 दिवसांत तुम्हाला आरोग्याशी संबंधित किरकोळ समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसात हॉर्ट पेशंटला खूप काळजी घ्यावी लागेल. ज्या लोकांना लिव्हरच्या संबंधित समस्या आहेत, त्यांना या आठवड्यात खूप सावध राहावं लागेल. काही ज्येष्ठांना निद्रानाश असू शकतो, ज्यासाठी त्यांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल. तुम्ही दारू आणि तंबाखूचं सेवन देखील टाळावं


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Aries Weekly Horoscope : जानेवारीचा नवीन आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य