Aries Weekly Horoscope 06 To 12 January 2025 : हिंदू कॅलेंडरनुसार, जानेवारी महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा मेष (Aries) राशीसाठी नेमका कसा असणार आहे? मेष राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने नवीन आठवडा मेष राशीसाठी लाभदायी असणार आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी मेष राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Love Horoscope)
या आठवड्यात प्रियकराच्या भावना दुखवू नका, त्यामुळे नात्यात वाद निर्माण होऊ शकतात. जे लोक प्रेमसंबंधांतही इगो बाळगतात, अहंकार बाळगतात, त्यांनी नात्यातील समस्या हाताळताना थोडं सावध राहावं. विशेषत: या आठवड्यात वाद टाळा. या आठवड्यात मेष राशीच्या अविवाहित मुलींना प्रपोजल येऊ शकतं. प्रेम जीवनात भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. चांगले श्रोते व्हा, जोडीदाराच्या भावनांनाही महत्त्व द्या, त्यांचं थोडं ऐका.
मेष राशीचे करिअर (Aries Career Horoscope)
कामाच्या ठिकाणी चढ-उताराची परिस्थिती निर्माण होऊ शकते. मिटींगमध्ये तुमची वागणूक मोठी भूमिका बजावेल. जे लोक वरिष्ठ पदावर आहेत त्यांना तणावाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्या कामात एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज आहे त्या कामात पुढे सरसवा. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा निर्णय घेऊ शकता आणि तुमचा जॉब प्रोफाईल CV अपडेट करू शकता. व्यवसायिकांना नवीन भागीदारी मिळाल्याने आनंद होईल, येत्या काळात निधीही चांगला मिळेल. काही व्यापारी नवीन क्षेत्रात व्यवसाय सुरू करू शकतात.
मेष राशीची आर्थिक स्थिती (Aries Wealth Horoscope)
या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील, तुम्हाला अनेक ठिकाणांहून निधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील हा काळ शुभ असेल. या काळात तुम्ही इलेक्ट्रॉनिक उपकरणं, वाहन किंवा नवीन घर खरेदी करू शकता. तुम्ही परदेशात सुट्टीची योजनाही करू शकता. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींसोबत सुरू असलेले आर्थिक वाद सोडवण्यात यश मिळेल.
मेष राशीचे आरोग्य (Aries Health Horoscope)
काही ज्येष्ठांना श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात. चांगला आहार घ्या. निरोगी जीवनशैली राखा. काही महिलांना पोट, नाक आणि हाडांशी संबंधित समस्या असू शकतात. जंक फूड टाळा. अधिक फळं आणि भाज्या खा. मुलांनी थोडं सावध राहावं. संध्याकाळी खेळताना दुखापत होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :