Surya Nakshatra Parivartan : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं. सूर्य देव आत्मा, मान-सन्मान आणि नेतृत्वाचा कारक ग्रह मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, भगवान सूर्याचं नक्षत्र परिवर्तन फार महत्त्वाचं मानलं जातं. भगवान सूर्य ठराविक काळानंतर नक्षत्र परिवर्तन करतात याचा सर्व राशींवर परिणाम होतो. 


सूर्याचा शनीच्या नक्षत्रात प्रवेश 


ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य देवाने सकाळी 3 वाजून 20 मिनिटांनी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. उत्तरा भाद्रपद नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी देवाला मानलं जातं. शनी हा भगवान सूर्याचा पुत्र आहे. शनी देव आणि भगवान सूर्य यांच्या शत्रूत्वाचं नातं आहे. पण, सूर्याचा शनीच्या नक्षत्रात होणारा प्रवेश काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


भगवान सूर्याचं नक्षत्र परिवर्तन मेष राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात मेष राशीच्या लोकांचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे परत मिळतील. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगली मोठी डील मिळू शकते. तसेच, बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल, 


वृषभ रास (Taurus Horoscope)


भगवान सूर्याचं नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या लोकांसाठी फार अनुकूल असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या करिअर संबंधित तुम्हाला चिंता राहणार नाही. मात्र, या ाकळात कोणताही निर्णय घेताना घाईगडबडीत विचार करु नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या अनेक संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळू शकते. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. 


हे ही वाचा :                                                       


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Astrology : आज गजकेसरी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मिथुनसह 5 राशींचं उजळणार नशीब, होणार अचानक धनलाभ