Surya Gochar 2022 : पंचागानुसार ग्रहांचा राजा सूर्याने आज 17 सप्टेंबर रोजी राशी बदलली आहे. त्याने त्याची सिंह रास सोडून कन्या राशीत प्रवेश केला आहे. कन्या राशीत प्रवेश केल्याने कन्या संक्रांती तयार होते. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार पितृ पक्षात कन्या संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीत सूर्याचे संक्रमण या राशींसाठी अशुभ काळ घेऊन आले आहे. याचा या राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल. यासाठी त्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांना आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागू शकतो.


सूर्य संक्रमणाचे घातक परिणाम  


वृषभ : कन्या राशीतील सूर्याचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी अशुभ काळ घेऊन आले आहे. वृषभ राशीच्या लोकांना सूर्याच्या भ्रमणात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. या काळात कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा किंवा फार काळजीपूर्वक निर्णय घ्या.


मिथुन : हे सूर्य संक्रमण मिथुन राशीच्या लोकांना मानसिक तणाव देऊ शकते . कामात अडथळे येऊ शकतात. यासाठी कोणतेही काम करण्यापूर्वी कामाचे योग्य नियोजन करा. प्रियजनांशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा.


सिंह : कन्या राशीतील सूर्याचे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल नाही. त्यांचे आर्थिक स्रोत बंद होऊ शकतात, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिघडू शकते. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. शहाणपणाने निर्णय घेण्याची हीच वेळ आहे. अनुभवी लोकांचा सल्ला घेणे चांगले.


कुंभ : सूर्य राशीच्या बदलाचा प्रभाव तुमच्यावर शुभ राहणार नाही. कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते. यामुळे आर्थिक जीवन काही प्रमाणात विस्कळीत होईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा.  


मकर : मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ त्रासदायक असेल . या काळात अनावश्यक वाद टाळा. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध ताणले जाऊ शकतात. याबाबत काळजी घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या