Surya Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्याला (Sun) ग्रहांचा राजा म्हणतात. सूर्य देव हा सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक मानला जातो. सूर्य देव (Surya Gochar) ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करातात. या परिणाम सर्व राशींच्या लोकांवर वेगवेगळा होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य 15 डिसेंबर रोजी रात्री 09 वाजून 56 मिनिटांनी धनु राशीत संक्रमण करणार आहे. सूर्य या राशीत नवीन वर्षाच्या 14 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे. धनु ग्रहाला देवगुरु बृहस्पतीची राशी म्हटलं जातं. सूर्याच्या राशी परिवर्तनाने या 3 राशींना सर्वात जास्त लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
सूर्याच्या धनु राशीत संक्रमणाने कुंभ राशीच्या लोकांना अनेक लाभ मिळणार आहेत. जर तुम्हाला परदेशात जाण्याची इच्छा असेल तर तुमची ही इच्छा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुमची कर्जमुक्ती होऊ शकते.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांना 15 डिसेंबरनंतर नशिबाची चांगली साथ मिळू शकते. तसेच, या काळात जर तुमचे अनेक दिवसांपासून काम रखडले असेल तर तुम्हाला त्यातून सुटका मिळेल. तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला स्मार्ट पद्धतीने काम करावं लागेल. यामुळे तुमचा बॉसदेखील तुमच्या कामाने खुश राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा असणार आहे. तसेच, आज तुम्ही जे काही कार्य कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच, तुमच्या वाणीत गोडवा दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉसकडून तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात येईल. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणे गरजेचे आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :