Surya Gochar 2024 : ग्रहांचा राजा सूर्य देव प्रत्येक महिन्यात आपली राशी (Horoscope) परिवर्तन करातत. मे महिन्यात सूर्य मेष राशीतून (Aries) वृषभ (Taurus) राशीत प्रवेश करणार आहे. 14 मे च्या दिवशी संध्याकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे. तर, 15 जून पर्यंत याच राशीत राहणार आहेत. सूर्याच्या वृषभ राशीत संक्रमण केल्याने मेष, कर्कसह या सहा राशींसाठी शुभदायी ठरणार आहे. या दरम्यान काही लोकांना नोकरी मिळवण्यात यश मिळू शकते. या सहा लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


मेष राशी 


वर्तमानकाळात सूर्य मेष राशीत विराजमान आहे. आणि मेषमधून नंतर वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. धनाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास 14 मे ते 15 जूनपर्यंत मेष राशीच्या लोकांसाठी फारच चांगला काळ असणार आहे. या दरम्यान तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसचे, तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. उप्तन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगलं यश देखील मिळण्याची शक्यता आहे. 


वृषभ रास 


सूर्याचं संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे. या दरम्यान वृषभ राशीच्या लोकांना अनेक चांगले परिणाम मिळतील. जर, तुम्ही स्पर्धात्मक परिक्षांसाठी तयारी करत असाल तर तुमचं अभ्यासात मन रमेल. तुम्ही जास्त मन लावून अभ्यास कराल. या व्यतिरिक्त जर तु्म्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला यात यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. 


कर्क रास 


सूर्याचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या नवीन संधी घेऊन येणारा असेल. या दरम्यान कर्क राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळू शकतं. तुमच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, बिझनेस करणाऱ्या लोकांना नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतात. तुमच्या तब्येतीतही सुधारणा होऊ शकते. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. जर तुम्ही नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. 


सिंह रास 


सूर्य ग्रहाचं संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी देखील लाभदायी ठरणार आहे. तुमच्या करिअरच्या दृष्टीने देखील हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होईल. तसेच, तुमची पदोन्नती देखील होण्याची शक्यता आहे. 


कन्या रास 


कन्या राशीसाठी 15 जून पर्यंतचा काळ शुभ असणार आहे. या दरम्यान तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. त्यामुळे तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. भागीदारीत केलेल्या व्यवसायातून तुम्हाला लाभ मिळू शकतो. 


धनु रास 


सूर्याच्या संक्रमणामुळे धनु राशीच्या लोकांना वाहन सुखाची प्राप्ती होऊ शकते. या दरम्यान तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता. तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्याची तुम्हाला संधी मिळेल. सूर्याच्या संक्रमणामुळे तुम्हाला अनेक नवीन प्रस्ताव देखील मिळू शकतात. कौटुंबिक सुख-प्राप्ती तुम्हाला मिळेल. वडिलांबरोबरचे तुमचे नाते अधिक दृढ होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Jayanti 2024 : आज शनी जयंतीला जुळून आलाय सर्वार्थसिद्धी योग! 'या' 3 राशींवर असणार शनीदेवाची कृपा, धनसंपत्तीत होईल अपार वाढ, हाती घेतलेलं कामही होईल पूर्ण