Sun Transit 2024 : फक्त 23 दिवसांत सर्व अडचणी होतील दूर; ग्रहांचा राजा सूर्याच्या संक्रमणाने काही दिवसांतच नशीब पालटेल
Sun Transit 2024 : कन्या राशीत सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीने बुधादित्य योग जुळून येणार आहे. हा योग 6 राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आणि करिअरसाठी फार शुभ असणार आहे.
![Sun Transit 2024 : फक्त 23 दिवसांत सर्व अडचणी होतील दूर; ग्रहांचा राजा सूर्याच्या संक्रमणाने काही दिवसांतच नशीब पालटेल Sun Transit 2024 effects on these 5 zodiac signs money problems end in next 23 days marathi news Sun Transit 2024 : फक्त 23 दिवसांत सर्व अडचणी होतील दूर; ग्रहांचा राजा सूर्याच्या संक्रमणाने काही दिवसांतच नशीब पालटेल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/12/f60105d557934e081b7db43fbec020d11726126207324358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sun Transit 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, 16 सप्टेंबर 2024 रोजी सूर्य संक्रमण करुन कन्या राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचं हे संक्रमण 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांनी होणार आहे. त्यानंतर, 23 सप्टेंबर 2024 रोजी बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा प्रकारे कन्या राशीत सूर्य (Sun) आणि बुध ग्रहाच्या युतीने बुधादित्य योग जुळून येणार आहे. हा योग 6 राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आणि करिअरसाठी फार शुभ असणार आहे.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि बुधाचं संक्रमण प्रगती देणारा असेल. या काळात तुम्हाला अनेक स्त्रोतातून धनलाभ मिळेल. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांना सूर्य- बुधाच्या युतीचा चांगला लाभ मिळणार आहे. या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. या काळात तुम्हाला बिझनेसमध्ये अपेक्षित लाभ मिळेल. कुटुंबीयांबरोबर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता.
कर्क रास (Cancer Horoscope)
बुध आणि सूर्य ग्रहाचं संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. प्रमोशनच्या अनेक संधी मिळतील. तसेच, तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येतील.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीचा स्वामी सूर्य ग्रह आहे. सूर्याचं हे राशी परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुम्ही खूप पैसा कमवाल. पण त्या पैशांचा जपून वापर करा.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
सूर्य आणि बुध ग्रहाच्या युतीने बुधादित्य योग जुळून येणार आहे. त्यामुळे या राशीचे चांगले दिवस असतील. तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. तसेच, प्रमोशनची संधी उपलब्ध होऊ शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Gauri Visarjan 2024 : ज्येष्ठा गौरी विसर्जन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; आवर्जून टाळा 'या' चुका
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)