Vastu Tips : घर म्हटलं की, आनंदाचं वातावरण, दोन वेळचं अन्न, सुख समृद्धी आणि आर्थिक स्थैर्य या गोष्टी ओघओघाने आल्याच.. आपल्यापैकी प्रत्येक जण या सगळ्यासाठीच मेहनत करत असतो, धडपड करत असतो. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात आनंद नसेल, तर तुमचे जीवन निरर्थक बनते. यासाठी तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धीसाठी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करणे आवश्यक आहे. माता लक्ष्मीची उपसना केल्याने, ती प्रसन्न होईल आणि तुमचे घर नेहमी धनधान्याने भरलेले राहील.


अथक परिश्रम करूनही जर, तुमच्या घरात दारिद्र्य आणि कंगाली असेल, तर तुम्ही काही नियमित उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूचे छोटे-छोटे उपाय करून, तुम्ही तुमची दुर्बलता दूर करू शकता..


वास्तु टिप्स आणि उपाय:


- घरातील दारिद्र दूर करण्यासाठी घरात तुळशीचे रोप लावणे खूप गरजेचे आहे. या तुळशीच्या रोपाभोवती स्वच्छता ठेवावी. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. यामुळे घरात समृद्धी नांदते.


- घरात कोणतीही तुटलेली किंवा फुटलेली भांडी ठेवू नका. अशी भांडी घरात ठेवणे अशुभ मानले जाते  आणि यामुळे घरातील दुःख दूर होत नाही, असे म्हटले जाते.


- घरात आनंद नांदण्यासाठी कधीही घरात बंद घड्याळ ठेवू नका. कारण, घरातील बंद पडलेल्या घड्याळामुळे नशीबाचे चक्रही बंद पडते, अशी समजूत आहे. यामुळे घरातील पैशाची आवक थांबते आणि त्यामुळे घरातील संकटे वाढतात.


- ज्या घरात नळातून पाणी सतत गळत असते, त्या घरात पैसा टिकत नाही. घराची ड्रेनेज सिस्टीम वास्तुशास्त्रानुसार नसली, तरीही तुम्हाला नकारात्मक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. यासाठी घरात पाणी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे वाहून जाण्याची व्यवस्था असावी. यामुळे वास्तूत सुख समृद्धी नांदते. तसेच, गळती होणारे नळ त्वरित दुरुस्त करावेत.


- वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लागलेल्या कोळ्यांच्या जाळ्यामुळेही आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे टाळण्यासाठी घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवा आणि कोळ्याची जाळी साचू देऊ नका.


- देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवण्यासाठी विघ्नहर्ता गणेशाची मूर्ती किंवा फोटो मुख्य दारात लावावा, त्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.


- घराच्या मुख्य दरवाजासमोर चपला काढणे अशुभ मानले जाते. यामुळे देवी लक्ष्मीचा क्रोध ओढवतो असे म्हटले जाते. म्हणूनच घराच्या दारासमोर शूज काढू नका किंवा घरी आलेल्या पाहुण्यांनाही तसे करण्यास मनाई करा.


- संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेस घरात झाडू मारून नये. झाडू व्यवस्थित जागी ठेवला पाहिजे. झाडूला पाय लागू देऊ नका. झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हे देखील वाचा-