Solar Eclipse 2022 : 2022 वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी होणार आहे.  ग्रहणाची घटना धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप खास मानली जाते.  शनिवारी येणाऱ्या या अमावस्यामुळे शनि अमावस्येचा योग तयार होत आहे. त्यामुळे हे ग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. पण ग्रहणाचा प्रभाव कमी करण्यासाठी काही खास गोष्टींची काळजी घ्यावी. वेध सुरु होताच धार्मिक कार्ये करून ग्रहणांचा दुष्परिणाम टाळता येतो. जर राशीनुसार दान धर्म केल्यानंतर ग्रहण फलदायी ठरतं असं म्हटलं जातं. ग्रहण काळात अनेक ठिकाणी  मंदिरे देखील बंद केली जातात, पण ग्रहण काळात देवाचे नाव घेणं किंवा स्तोत्र पठण करणं शुभ मानलं जातं. जाणून घ्या कोणत्या  राशी कोणतं दान कार्ये तुमच्यासाठी शुभ असतील हे जाणून घ्या.


पंडित सुरेश श्रीमाली यांच्या मते या वर्षात एकूण चार ग्रहण आहेत. यापैकी दोन सूर्य आणि दोन चंद्र ग्रहण आहेत. वर्षातील पहिले ग्रहण हे येत्या शनिवारी 30 एप्रिलला आहे. तर दुसरे ग्रहण 25 ऑक्टोबरला होणार आहे. दोन्ही ग्रहण ही आंशिक आहे. 30 एप्रिलला  आमवस्या आहेत.  शनिवारी येणाऱ्या या अमावस्यामुळे शनि अमावस्येचा योग तयार होत आहे. ज्यामुळे चार राशींवर सूर्याचा विशेष प्रभाव असणार आहे. हे ग्रहण मेष राशीला भरणी नक्षत्रात लागणार आहे. त्यामुळे काही राशींसाठी हे ग्रहण अतिशय शुभ असणार आहे. ग्रहणाची घटना ही अशुभ देखील मानली जाते. ग्रहण लागल्यानंतर सूर्य पीडित होतो त्यामुळे शुभ घटनांच्या संख्या कमी होते. 


सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. तसेच सूर्य देवाचा संबंध मान- सन्मान आणि प्रतिष्ठेशी देखील संबंधित आहे.  ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर पडणार आहे. परंतु चार अशा राशी आहेत की, ज्यांच्यासाठी हे ग्रहण शुभ असणार आहे. वृषभ, कर्क, धनु, तूळ या राशीसाठी ग्रहण शुभ असणार आहे. या दरम्यान या राशीच्या व्यक्तींना यश मिळणार आहे. तसेच व्यापारात देखील फायदा होणार आहे.


30 एप्रिलला पहिले सूर्यग्रहण होणार आहे. हे ग्रहण भारतात मध्यरात्री 12:15 वाजता सुरू होईल आणि पहाटेच्या आधी 04:07 वाजता संपेल. हे सूर्यग्रहण भारतात नसून अटलांटिक, अंटार्क्टिका, दक्षिण अमेरिकेचा दक्षिण-पश्चिम भाग आणि पॅसिफिक महासागरात दिसणार आहे.


सूर्यग्रहणाच्या दिवशी चुकूनही 'या' गोष्टी करू नका 


सूर्यग्रहणाच्या वेळी पचनशक्ती कमजोर होते, त्यामुळे सूर्यग्रहण काळात अन्न खाऊ नये. ग्रहणाच्या वेळी स्वतःचे आणि विशेषतः गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या सावलीपासून संरक्षण केले पाहिजे. याशिवाय सूर्याकडे पाहणे टाळावे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)