Cheapest Smartphone : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला जर बजेट फ्रेंडली स्मार्टफोन हवा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनमध्ये, Oppo, Realme, Redmi आणि Samsung या स्मार्टफोनचा समावेश आहे.


Realme Narzo 50I : 


हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे आणि त्याची किंमत 7,499 पासून सुरु होते. हा स्मार्टफोन 2GB RAM सह जोडलेल्या पॉवरफुल ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो. यामध्ये 32GB इंटर्नल मेमरी आहे. त्याच वेळी, त्याच्या 4 जीबी रॅम व्हेरियंटमध्ये 64 जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत 8,999 रुपये आहे.


Redmi 9A : 


Redmi 9A मध्ये 3 GB RAM सह 32 GB इंटर्नल मेमरी आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत केवळ 7812 रुपये आहे. यात 6.53 इंचाचा डिस्प्ले आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.


SAMSUNG M02S :


Samsung M02s स्मार्टफोन 1.8GHz क्वालकॉम SDM450 ऑक्टा कोर प्रोसेसर 3GB रॅम आणि 32GB अंतर्गत स्टोरेजसह समर्थित आहे. यात 13MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. समोर, सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 5MP सेन्सर आहे. त्याची किंमत सुमारे 9999 रुपये आहे.


OPPO A12 : 
OPPO A12 मध्ये 3 GB RAM सह 32 GB इंटर्नल मेमरी आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत 9990 रुपये आहे.


Realme C21Y :


Realme C21Y मध्ये 3 GB RAM सह 32 GB इंटर्नल मेमरी आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत 9,499 रुपये आहे.


महत्वाच्या बातम्या :