एक्स्प्लोर

Solar Eclipse 2024 : सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे धार्मिक नियम पाळू नका : खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण

Solar Eclipse 2024 : आज सूर्यग्रहण असलं तरी ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे आज ग्रहणाचे नियम पाळणं जरुरी नाही, असं ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे. ते नेमकं काय म्हणाले? पाहा...

Surya Grahan 2024 : यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2024) आज, म्हणजेच सोमवार 8 एप्रिल रोजी फाल्गुन कृष्ण अमावास्येच्या दिवशी होणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहण असून हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणविषयक जे धार्मिक नियम पाळले जातात, तसे कोणतेही धार्मिक नियम भारतात पाळण्याची गरज नाही, असं ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण (D. K. Soman) यांनी सांगितलं आहे.

पुढे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले, आज असलेलं खग्रास सूर्यग्रहण हे अमेरिकेतील विविध राज्यातून दिसणार आहे. अमेरिकेतील लोक सूर्यग्रहण पाहू शकतील. भारतात सूर्यग्रहण दिसणार नाही. 

ग्रहणाचा दुसरा दिवस, म्हणजेच मंगळवार, 9 एप्रिल रोजी चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे, म्हणजेच गुढीपाडव्याचा दिवस. साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस. या दिवशी शालिवाहन शके 1946 चा प्रारंभ होत आहे. खग्रास सूर्यग्रहणाचा आणि गुढीपाडव्याचा काहीही संबंध नाही, त्यामुळे गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणेच उत्साहात साजरा करावा, असं दा. कृ. सोमण म्हणाले. या दिवशी उत्साहाने गुढी उभारायची आहे, गुढी पूजन करायचं आहे आणि पंचांग वाचन करायचं आहे. खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्याने ग्रहणविषयक कोणतेही धार्मिक नियम सोमवारी पाळण्याची आवश्यकता नाही.

सूर्यग्रहण नेमकं कुठे दिसणार?

2024 सालातील पहिलं सूर्यग्रहण 8 एप्रिल रोजी होणार आहे. मात्र, हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण पॅसिफिक पश्चिम युरोप, अटलांटिक, आर्क्टिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका (अलास्का वगळता), कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, इंग्लंडचा वायव्य प्रदेश आणि आयर्लंडमध्ये होईल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. भारतात न दिसू लागल्याने त्याला धार्मिक महत्त्वही राहणार नाही आणि तो सुतक काळ मानला जाणार नाही. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण, जे मीन आणि रेवती नक्षत्रात होईल.

सूर्यग्रहणाची वेळ : 8 एप्रिल रोजी रात्री 09:12 ते मध्यरात्री 01:25.
सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी : 4 तास 25 मिनिटे

ऑक्टोबरमध्ये 2024 वर्षातील दुसरं सूर्यग्रहण

2024 सालचे दुसरे सूर्यग्रहण 2 आणि 3 ऑक्टोबरच्या मध्यरात्री होणार आहे. 2024 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9:13 ते 3:17 पर्यंत राहील. ग्रहणाचा एकूण कालावधी 6 तास 4 मिनिटे असेल. दुसऱ्या सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 2 ऑक्टोबरला सकाळी 9.13 वाजता सुरू होईल.

हेही वाचा:

Solar Eclipse 2024 : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्यग्रहणाच्या दिवशी बनले दुर्मिळ योग; 'या' राशीचे लोक होणार गडगंज श्रीमंत, एका महिन्यात पालटणार नशीब

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: कुंभ, मीन राशी...पैसा, नोकरीत मोठे बदल! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, संधी सोडू नका.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
कुंभ, मीन राशी...पैसा, नोकरीत मोठे बदल! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा, संधी सोडू नका.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope: धनु, मकर राशी...खर्च सांभाळून करा! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आयुष्यात बदल होणार! आर्थिक, करिअर, संधी.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशी...खर्च सांभाळून करा! नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आयुष्यात बदल होणार! आर्थिक, करिअर, संधी.. साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका! तुळशी मातेला काय अर्पण करावे? काय टाळावे? धार्मिक मान्यता, परंपरा...
तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका! तुळशी मातेला काय अर्पण करावे? काय टाळावे? धार्मिक मान्यता, परंपरा...
Shani Sade Sati : 2027 ते 2030 पर्यंत 'या' 2 राशींवर असणार शनिची ढैय्या; एकामागोमाग येतील संकटं, तुमची रास कोणती?
2027 ते 2030 पर्यंत 'या' 2 राशींवर असणार शनिची ढैय्या; एकामागोमाग येतील संकटं, तुमची रास कोणती?

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul : गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
गोकुळच्या दूध दरात 6 रुपयांची वाढ, प्रशासक काळातील तोटा भरुन काढण्यासाठी ग्राहकांच्या माथी दरवाढ, शेतकऱ्यांची मात्र तीन रुपयांवर बोळवण
Satej Patil on Gokul milk Rate : म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
म्हैस दूध 6 रुपये, गाय दूध 4 रुपयांनी महागलं; आजपासून दरवाढ लागू, सतेज पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले....
Girish mahajan latur water: ...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
...तर लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी पुरवठा होऊ शकतो; मंत्री गिरीश महाजनांचं अमित देशमुखांना प्रत्युत्तर
Gold Silver Rate: 48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
48 तासांत सोन्याचे दर 7 हजारांनी घसरले, चांदीची किंमतही 10 हजार रुपयांनी कमी; जानेवारीपासून पुन्हा तेजी येण्याचा अंदाज, घसरणीमागची कारणंही समोर
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
बीडमध्ये शैक्षणिक वर्तुळात खळबळ, बोगस भरती झालेल्या 73 शिक्षकांची सेवा समाप्त, नोकरी कायमची गमावली
Kurla Phoenix Mall Mumbai News: मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
मुंबईत तरुण-तरुणीला दगड, बेल्ट, लाकडाने मारहाण; आता धक्कादायक कारण आलं समोर, प्रत्यक्षदर्शी महिलेनेही सांगितली हादरवणारी माहिती
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
साताऱ्यातील पंप्ड स्टोरेज प्रकल्पाला दुहेरी दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही काम बंदचे निर्देश, वन्यप्रेमींचा विरोध वाढला
Rajasthan Panchayat Election Results 2026 : राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी; सत्ताधारी भाजपाचा मोठा पराभव, ग्रामीण भागात काँग्रेसची पकड पुन्हा मजबूत
Embed widget