एक्स्प्लोर

Solar Eclipse 2024 : 8 एप्रिलला लागणार वर्षातील पहिलं सूर्यग्रहण; ग्रहणाचा पृथ्वीवर 'असा' होईल प्रभाव

Solar Eclipse 2024 : सुमारे 54 वर्षांनंतरचे हे सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल, जे अंदाजे 5 तास 25 मिनिटे चालेल.

Solar Eclipse 2024 : ज्योतिषशास्त्रात सूर्यग्रहणाला (Solar Eclipse) फार महत्त्व आहे. कारण या ग्रहणाच्या प्रभावामुळेच राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम घडतात. यावर्षी वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण तब्बल 54 वर्षांनंतर लागणार आहे त्यामुळे याला विशेष महत्त्व आहे. हे सूर्यग्रहण अंदाजे 5 तास 25 मिनिटं चालेल. विशेष म्हणजे, चैत्र नवरात्रीच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण लागणार आहे.

सूर्यग्रहणाची वेळ काय असेल? 

अमेरिकन स्पेस एजन्सी NASA च्या म्हणण्यानुसार, 8 एप्रिल रोजी संपूर्ण सूर्यग्रहण साधारण 70 मिनिटं चालणार आहे. हे ग्रहण भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी सुरू होणार असून 9 एप्रिल रोजी रात्री 2 पर्यंत असणार आहे. ग्रहणाची वेळ ही रात्रीची असल्याने भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. 

सूर्यग्रहण कोणत्या देशांमध्ये दिसणार? 

8 एप्रिल 2024 रोजी हे सूर्यग्रहण आर्क्टिक, मेक्सिको, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, उत्तर अमेरिका (अलास्का वगळता), पश्चिम युरोप, पॅसिफिक, इंग्लंडचा वायव्य प्रदेश, मध्य अमेरिका, आयर्लंड, अटलांटिक आणि कॅनडा या देशांमध्ये दिसणार आहे. जगातील ज्या भागात सूर्यग्रहण होणार आहे, त्या ठिकाणी सूर्यमालेत उपस्थित शुक्र आणि गुरू देखील दिसू शकतात. याशिवाय सूर्यग्रहणाच्या वेळी धूमकेतू ताराही स्पष्टपणे दिसणार आहे. त्यामुळे हे सूर्यग्रहण विशेष असणार आहे. 

सूर्यग्रहण कुठे पाहाल?

तुम्हाला जर हे सूर्यग्रहण पाहायचं असेल तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे हे सूर्यग्रहण पाहू शकतात. यासाठी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) 8 एप्रिल रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचे थेट प्रक्षेपण करणार आहे. ते थेट पाहण्यासाठी तुम्ही https://eclipse-explorer.smce.nasa.gov वर क्लिक करू शकता. असं म्हटलं जातं की, सूर्यग्रहण हे कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये. त्यामुळे आपल्या डोळ्यांना इजा होते. त्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी, आपण विशेष प्रकारचे काच किंवा ऑप्टिक्स वापरू शकता.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा:

Surya Grahan 2024: तब्बल 54 वर्षांनंतर 8 एप्रिलला लागणारे सर्वात मोठे सूर्यग्रहण अतिशय प्रभावशाली, 'या' चार राशी होतील करोडपती

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 October 2026: आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! विशेष शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज संकष्टी चतुर्थीचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! विशेष शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
“कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
Kumbh Mela 2027: गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!

व्हिडीओ

Raj Thackeray Karjat Full Speech : महाराष्ट्र उद्योगपतींच्या चावीवर चालणार नाही! राज ठाकरेंची गर्जना
Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varanasi MLC Election Result : पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये भाजपला मोठा धक्का, शिक्षक मतदारसंघामध्ये समाजवादीचा विजय, पदवीधरमध्येही विजयाच्या उंबरठ्यावर
Raj Thackeray : अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अमित शाह, कुऱ्हाडीचा आवाज येतो, पण देवाच्या काठीचा येत नाही, तो ज्या दिवशी येईल...; कर्जत वृक्षतोडीवरून राज ठाकरे भडकले
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
मुंबईत 15 लाखांच्या लाचप्रकरणी अधिकारी अटकेत; येवल्यात 1500 रु घेताना तलाठी रंगेहात अडकला
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तुतारीने दोन जागा जिंकल्या, जयंत पाटलांचा भाजपला टोला; कराळे मास्तरांच्या निलंबनावरही बोलले
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Embed widget