Astrology  :  जर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत असेल आणि तुमचे स्वतःवर नियंत्रण नसेल तर राग येणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. तुमचा हा राग तुमच्यासाठीच हानिकारक ठरू शकतो. रागामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. राग आल्याने कोणतीही समस्या सुटत नाही. ज्योतिषात रागावर नियंत्रण ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता.


ज्योतिषी पूनम चौधरी यांच्या म्हणण्यानुसार, व्यक्तीच्या आतील ग्रहांमुळेही राग येतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य, चंद्र आणि मंगळ एकमेकांशी संबंधित असतील तर त्या व्यक्तीला जास्त राग येतो.


रागावर  असे नियंत्रण ठेवा


ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्हाला जास्त राग येत असेल तर चंदनाचा वापर करा. याच्या सेवनाने राहू दोषापासून आराम मिळतो आणि रागही शांत होतो.
राग शांत करण्यासाठी हनुमानजीची पूजा करा आणि हनुमान चालिसाचे पठण करा.
रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने रागही शांत होतो.
चांदीच्या अंगठीत किंवा पेंडेंटमध्ये मोठ्या आकाराचा खरा मोती घाला.
घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी पूर्व दिशेला दिवा लावा. या उपायाने राग कमी होतो. 
रोज नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करा.
रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज मोठ्यांचा आशीर्वाद घ्या.
रागापासून दूर राहण्यासाठी लाल रंगाचा कमीत कमी वापर करा.
सकाळी उठल्यावर सर्वप्रथम पृथ्वी मातेला नमन करा.  
अंथरुण सोडल्यानंतर किमान 15 मिनिटे कोणाशीही बोलू नका.
आपल्या आजूबाजूला घाण साचू देऊ नका आणि स्वच्छतेची नियमित काळजी घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :