Shukra Uday 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, धन आणि वैभव आणि संपत्तीचा दाता म्हणून शुक्र (Venus) ग्रहाची ओळख आहे. नुकताच शुक्र ग्रह अस्तापासून उदय होणार आहे. त्यामुळे शुक्राचं मीन राशीत उदय होणं सर्व 12 राशींसाठी शुभ किंवा अशुभ ठरु शकतं. मात्र, यामध्ये 3 राशी अशा आहेत ज्यांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शुक्राचं उदय होणं वृषभ राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक महत्त्वाचे बदल घडून येतील. तसेच, तुमच्या करिअर आणि व्यवसायात चांगले बदल घडून येतील. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या काळात तुम्ही नवीन प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा आणि चांगला ठरणार आहे. या काळात तुमच्या नशिबाची दारं उघडू शकतात. तसेच, तुमची आर्थिक तंगीपासून सुटका होईल. तसेच, जै लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर मिळेल. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील. या दरम्यान तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता. मित्रांच्या साथीने तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या लव्ह लाईफमध्ये चांगला रोमान्य दिसून येईल. आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मित्रांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. या काळात तुमची नाती देखील अधिक घट्ट होतील. पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: