Shani Dev 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायदेवता शनीच्या (Shani Dev) स्थितीत जेव्हा बदल होतो तेव्हा त्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होतो. यामुळे काही राशींना लाभ मिळतो तर काही राशींसाठी हा काळ आव्हानात्मक असतो. सध्या शनी (Lord Shani) कुंभ राशीत स्थिती आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 31 मार्च रोजी रात्री 12 वाजून 43 मिनीटांनी शनीचा मीन राशीत उदय होणार आहे. गुरुच्या राशीत उदय झाल्यामुळे काही राशींना याचा चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs)कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शनी बाराव्या चरणात उदय होणार आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांच्या जीवनातील समस्या हळुहळू संपतील. तुमची एकाग्रता वाढताना दिसेल. तसेच, चांगल्या नोकरीची संधी मिळेल. तसेच, तरुणांना परदेशी जाण्याची संधी मिळेल. तसेच, धार्मिक कार्याच तुमची रुची वाढलेली दिसेल. या काळात तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय होणं फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या दहाव्या चरणात शनीचा उदय होणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा देखील विस्तार वाढेल. शनिदेवाची तुमच्यावर कृपा असेल. त्यामुळे या काळात तुम्ही जी काही मेहनत घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. त्यामुळे तुम्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचं उदय होणं फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला विकास झालेला दिसेल. तसेच, तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होईल. तुमच्या जीवनात आनंद टिकून राहील. तसेच, या काळात तुम्ही नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. या राशीच्या नवव्या चरणात शनीचा उदय झाल्यामुळे पार्टनरबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. लहान मुलांची देखील अभ्यासात रुची वाढेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                               

Horoscope Today 23 March 2025 : रविवारचा दिवस 5 राशींसाठी आनंदाचा! मिळणार गोड बातमी, वाचा आजचे राशीभविष्य