Shukra Gochar 2025 : दानवांचा गुरू शुक्र हा नवग्रहातील विशेष ग्रह मानला जातो. या ग्रहाच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्व राशींवर होतो. धन आणि समृद्धी देणारा शुक्र हा राशीसोबत नक्षत्रही बदलतो. शुक्र 17 जानेवारीला सकाळी 7:51 वाजता पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. गुरूच्या नक्षत्रात शुक्राचं आगमन झाल्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनानंतर 3 राशींना सोन्याचे दिवस येतील, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.


मेष रास (Aries)


धनाचा दाता शुक्र पूर्वाभाद्रपदात प्रवेश करणार असून यानंतर तो मेष राशीच्या अकराव्या घरात स्थित असणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकतं. या राशीच्या लोकांना पैसे कमावण्यासाठी हा सर्वात चांगला काळ असू शकतो. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. मुलांच्या भेडसावणाऱ्या समस्या दूर होऊ शकतात. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांना मोठ्या आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकतं. तुमच्या कुंडलीच्या नवव्या घरात शुक्र असल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. जीवनात चांगले सकारात्मक परिणाम घडू शकतात. शुक्राच्या कृपेने तुम्हाला लांबचे प्रवास करण्याची किंवा परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. उच्च शिक्षणाचे दरवाजेही उघडतील. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. यासोबतच तुम्ही तुमच्या भावा-बहिणींसोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला आई-वडील आणि गुरु यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. आत्मविश्वास झपाट्याने वाढेल.


कुंभ रास (Aquarius)


शुक्र पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा कुंभ राशीच्या लोकांचं नशीब उजळेल. कुंभ राशीच्या चढत्या घरात शुक्र राहणार आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांसाठी शुक्राचा नक्षत्र बदल विशेष असणार आहे. तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं यावेळी पूर्ण होतील. तुम्हाला सुख-समृद्धी प्राप्त होईल. नोकरीत सकारात्मक बदलाचे संकेत आहेत, व्यापारातही यश मिळेल. पालकांशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात. वैवाहिक जीवनात सदैव आनंद राहील. अविवाहित लोकांनाही लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Astrology : तब्बल 17 वर्षांनंतर यम ग्रहाचा शनीच्या राशीत प्रवेश; 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह पगारवाढीचे योग