Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनीची (Shani Dev) ज्या राशीच्या लोकांवर विशेष कृपा असते त्या राशीच्या लोकांवर कोणत्याच संकटाचा सामना करावा लागत नाही. शनी (Lord Shani) प्रत्येक राशीला आपल्या कर्मानुसार फळ देतो. प्रत्येक अडीच वर्षानंतर शनी राशी परिवर्तन करतात. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च 2025 रोजी शनी मीन राशीत संक्रमण करणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात वक्री होणार आहेत. मीन राशीत शनीने वक्री केल्यामुळे 3 राशींच्या लोकांचं भाग्य उजळू शकतं. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


शनीची उलटी चाल वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरु शकते. या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार चांगला ठरणार आहे. वर्षाच्या मध्यात म्हणजेच जुलै महिन्यात तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराची चांगली साथ लाभेल. तसेच, परदेशात जाण्याचा योग लवकरच जुळून येणार आहे. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी शनीच्या वक्रीचा हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. शनीची कृपा असल्या कारणाने तुमच्यासाठी हा काळ चांगला असेल. शनीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळेल. आरोग्य देखील ठणठणीत राहील. 


कुंभ रास (Aqurius Horoscope)


कुंभ राशीत सध्या शनी विराजमान आहेत. त्यामुळे या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळेल. तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची तुम्हाला चांगली संधी मिळेल. तुमची प्रगती दिसून येईल. तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                                                         


Astrology : आज शशि आणि पुष्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कर्कसह 'या' 5 राशींवर असणार गणरायाची कृपा