Shukra Gochar 2024 : सर्व ग्रहांप्रमाणे शुक्र (Venus) देखील ठराविक काळानंतर राशी बदलतो, नक्षत्र बदलचो, ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होतो. डिसेंबरमध्ये शुक्र दोनदा राशी तर बदलणारच आहे, त्यासोबत नक्षत्रात देखील परिवर्तन दिसेल. वर्षाच्या शेवटी शुक्र आणि मंगळ धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करत आहेत. अशा स्थितीत काही राशीच्या लोकांना नवीन वर्ष 2025 मध्ये बंपर फायदे मिळू शकतात.


जेव्हा शुक्र धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा काही राशींचं भाग्य उजळू शकतं. वैदिक पंचांगानुसार, शुक्र 22 डिसेंबर रोजी रात्री 10.25 वाजता धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि 4 जानेवारीपर्यंत तो या नक्षत्रात राहील. हा काळ 3 राशींसाठी भाग्याचा असणार आहे, या 3 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


शुक्राचा धनिष्ठा नक्षत्रातील प्रवेश वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असेल. अनेक धार्मिक कार्यक्रमातही तुम्ही उत्साहाने सहभाग घ्याल. या काळात नोकरीच्या अनेक संधीही उपलब्ध होऊ शकतात. यासह, तुम्ही तुमच्या कामात आनंदी आणि समाधानी दिसाल. तुम्हाला व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. कामामुळे तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो. यातून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील. फक्त तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.


सिंह रास (Leo)


धनिष्ठा नक्षत्रात शुक्राचा प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्याचा ठरू शकतो. या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. याद्वारे तुम्ही बँकेकडून कर्ज मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तुम्ही अनेक ठिकाणी प्रवासही करू शकतात. करिअरच्या क्षेत्रात खूप प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात कोणतीही रणनीती थोडी सावधगिरीने बनवा, तरच तुम्हाला फायदा होऊ शकेल.


मकर रास (Capricorn)


या राशीच्या लोकांसाठी मंगळाच्या नक्षत्रात शुक्राचं भ्रमण फायदेशीर सिद्ध होऊ शकतं. या राशीच्या लोकांचं जीवन आनंदाने बहरेल. यासोबतच कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळू शकेल आणि तुमच्या कामाचं कौतुकही होईल. तुमचा पगार वाढण्याचीही शक्यता आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्ही केलेली रणनीती यशस्वी ठरू शकते. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. उत्पन्नाचे काही नवे स्रोत उघडतील. याशिवाय भविष्यासाठी पैसे वाचवण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Astrology : नवीन वर्ष 2025 मध्ये बनतोय दुर्मिळ योग; 3 राशींचं नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह होणार अपार धनलाभ