Venus Transit In Sagittarius 2024: ज्योतिषशास्त्रात शुक्र हा प्रेम, विवाह, सौंदर्य आणि सुखसोयींसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. कुंडलीत शुक्र बलवान असेल तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. शुक्र हा ग्रह खूप शुभ मानला जातो, जो भौतिक सुखाचा दाता आहे. सध्या शुक्र वृश्चिक राशीत असून 18 जानेवारी 2024 रोजी तो वृश्चिक राशीतून धनु राशीत प्रवेश करेल. शुक्राचे हे मार्गक्रमण काही राशींसाठी खूप फलदायी ठरणार आहे. धनु राशीत शुक्राच्या मार्गक्रमणामुळे कोणत्या राशींचं (Zodiac Signs) भाग्य उजळेल ते जाणून घेऊया.


वृषभ रास (Gemini)


वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र हा सहाव्या घराचा स्वामी आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे हे मार्गक्रमण खूप फलदायी ठरेल. नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हे मार्गक्रमण खूप चांगलं असेल. शुक्र ग्रहाच्या कृपेने तुमचं भाग्य उजळेल. या राशीचे लोक जे विवाहित आहेत आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच काळापासून समस्यांना तोंड देत आहेत, त्यांना लवकरच आराम मिळेल. कौटुंबिक सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. परदेश प्रवासाची शक्यता आहे.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांचा स्वामी शुक्र आहे. शुक्र या राशीच्या लोकांना भौतिक सुख प्रदान करतो. शुक्राच्या या संक्रमणाने तुम्हाला घर किंवा नव्या वाहनाचे सुख मिळू शकते. तुम्ही नवीन घर किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी वाढेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन संधीही मिळतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. या राशीचे लोक जे व्यापारी आहेत, त्यांना मोठा आर्थिक लाभही मिळेल. एखादा महत्त्वाचा करार निश्चित होऊ शकतो. शुक्राचे हे मार्गक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरेल, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.


मकर रास (Capricorn)


शुक्राचं राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला कुठूनतरी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. या राशीचे लोक नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती करतील. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत असेल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. मकर राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व सुधारेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मकर राशीच्या अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येतील. 


(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Dev : शनि 2024 मध्ये 3 वेळा बदलणार आपली चाल; 'या' राशींचं नशीब उजळणार, मिळणार बंपर लाभ