Shani 2024 : नवीन वर्ष 2024 मध्ये शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार नाही. परंतु या वर्षी शनिदेव (Shani Dev) कुंभ राशीतच आपली हालचाल बदलत राहील. 2024 मध्ये शनीच्या हालचालीत तीन वेळा बदल होतील, ज्याचा सर्व 12 राशींवर परिणाम होईल. कुंभ राशीमध्ये स्थित शनीचा 11 फेब्रुवारीला अस्त होईल आणि 18 मार्चला उदय होईल. त्यानंतर 29 जूनला शनि उलटी चाल चालेल.


नवीन वर्षात शनीच्या हालचालीत तीनदा होणार असलेल्या बदलामुळे काही राशींना सकारात्मक परिणाम मिळतील, तर काही राशींना नकारात्मक परिणाम मिळू शकतात. 2024 मध्ये शनीची बदलती चाल कोणत्या राशींसाठी फायदेशीर ठरेल? जाणून घेऊया.


सिंह रास (Leo)


शनि 2024 मध्ये तीनदा चाल बदलून सिंह राशीच्या लोकांना चांगला लाभ देईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा सुधारेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली भागीदारी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात फायदा होईल. तुमच्या करिअरमध्ये सुरू असलेल्या समस्याही हळूहळू संपू लागतील. तुमच्या जोडीदारासोबतचे नाते पुन्हा रुळावर येईल आणि सर्व वाद संपतील. तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. शनीच्या शुभ प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे.


वृषभ रास (Gemini)


वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीची बदलती चाल फायदेशीर ठरू शकते. तुमच्या लव्ह लाईफमध्ये रोमान्स कायम राहील. व्यावसायिकांचे प्रश्न आपोआप सुटू लागतील. तब्येतीत चढ-उतार असतील. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली राहील. तुम्हाला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. या काळात पैसा हुशारीने खर्च करा.


तुळ रास (Libra)


शनि तुळ राशीच्या लोकांना अनुकूल परिणाम देईल. या वर्षी शनीच्या कृपेने तुम्ही केलेल्या बहुतेक कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यापारी आपल्या कामात चांगली कामगिरी करतील, करार अंतिम करण्यासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. शनीच्या कृपेने धन आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुळ राशीच्या लोकांना शनीच्या चालीमुळे खूप फायदा होईल. व्यवसाय आणि नोकरी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी कराल. या वर्षात तुम्हाला खूप सकारात्मक वाटेल. धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shaniwar upay: शनीचा त्रास टाळण्यासाठी संध्याकाळनंतर करा 'हे' काम; सगळ्या अडचणी होतील दूर!