Shrawan Mass 2024 : आषाढ महिना जसजसा संपत येतो तसतशी श्रावण (Shrawan) महिन्याची चाहूल लागते. अर्थात, श्रावणाला अत्यंत पवित्र महिना मानला जातो. कारण या महिन्यात अनेक सण, उत्सव साजरे केल जातात. या दिवसांत मंगळागौरी पूजनापासून ते गोपाळकालापर्यंत अनेक सण अत्यंत गुण्या-गोविंदाने साजरे होतात. त्यामुळेच हा सर्वांचा प्रिय महिना देखील मानला जातो.
यंदा 5 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. त्यानुसार या श्रावणात कोणकोणते महत्त्वाचे सण येणार आहेत. तसेच, त्यांचं महत्त्व नेमकं काय आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या दिवसांची यादी 2024 (Shrawan Mass 2024 List)
1 ऑगस्ट - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यातिथी
2 ऑगस्ट - शिवरात्री
2 ऑगस्ट - सूर्याचा आश्लेषा नक्षत्र प्रवेश वाहन - गाढव
3 ऑगस्ट - अमावस्या प्रारंभ दुपारी 03.50
4 ऑगस्ट - दर्शअमावस्या , दीपपूजा, अमावस्या समाप्ती सायं.04.42
5 ऑगस्ट - श्रावण मासारंभ, चंद्रदर्शन, श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ : तांदूळ
6 ऑगस्ट - मंगळागौरी पूजन
8 ऑगस्ट - विनायक चतुर्थी, नागचतुर्थी उपवास, बृहस्पती पूजन, दूर्वागणपती व्रत
9 ऑगस्ट - नागपंचमी, जागतिक आदिवासी दिन
10 ऑगस्ट - कल्की जयंती
11 ऑगस्ट - आदित्य पूजन
12 ऑगस्ट - श्रावणी सोमवार शिवपूजन शिवामूठ - तीळ
13 ऑगस्ट - दुर्गाष्टमी, मंगळागौरी पूजन
14 ऑगस्ट - पतेती
15 ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन, पारशी नूतनवर्ष 1394 प्रारंभ
17 ऑगस्ट - शनिप्रदोष
19 ऑगस्ट - नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
22 ऑगस्ट - संकष्ट चतुर्थी चंद्रोदय 09.02
23 ऑगस्ट - राष्ट्रीय अंतराळ दिन
26 ऑगस्ट - श्रीकृष्ण जयंती
27 ऑगस्ट - गोपाळकाला
मंगळागौरी पूजन
श्रावण महिन्यात मंगळागौरीला विशेष महत्त्व आहे. या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचे पूजन केले जाते. मंगळागौरीचे व्रत हे पार्वती देवी म्हणजेच गौरीला समर्पित आहे. घरात समृद्धी यावी, उत्तम आरोग्य लाभावं आणि वैवाहिक सुखाच्या आशीर्वादासाठी यासाठी मंगळागौरीचे पूजन केले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. असे मानले जाते की, विवाहित महिलांसाठी मंगळागौरीचे व्रत केल्यास त्यांना सौभाग्य प्राप्त होते आणि त्यांचे दांपत्य जीवन आनंदी होते.
विनायक चतुर्थी
हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला संकष्टी आणि विनायक चतुर्थी तिथी समर्पित आहे. चतुर्थीला श्रीगणेशाचे विधीवत पूजन करता व्रत करण्याची परंपरा आहे. दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळलं जाते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :