Kamika Ekadashi 2024 : हिंदू धर्मग्रंथानुसार, प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी फार खास मानली जाते. आज कामिका एकादशीचा (Kamika Ekadashi) व्रत पाळला जाणार आहे. भगवान विष्णू यांना समर्पित ही तिथी आहे. कामिका एकादशीला पवित्रा एकादशी या नावानेसुद्धा ओळखलं जातं. आजच्या दिवशी भगवान विष्णूंची (Lord Vishnu) आराधना, उपासना केल्याने विष्णूंची विशेष कृपा लाभते अशी मान्यता आहे.
जर तुम्हाला आर्थिक, शारीरिक, मानसिक कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत ते जाणून घेऊयात.
कामिका एकादशी उपाय (Kamika Ekadashi Upay 2024)
आर्थिक अडचणींतून मुक्त होण्यासाठी करा 'हे' उपाय
जर तुम्हाला आर्थिक समस्यांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावावा. तसेच, 'ओम नमो भगवते नारायणाय' या मंत्राचा 11 वेळा जप करावा.
कर्जातून मुक्ती हवी असल्यास 'हे' उपाय करा
जर तुम्ही फार कर्जबाजारी झाला असाल आणि तुम्हाला कर्जातून मुक्ती हवी असल्यास त्यासाठी पिंपळाच्या वृक्षावर जल अर्पण करा. असं म्हणतात की, पिंपळाच्या वृक्षात भगवान विष्णूचा वास असतो. मान्यतेनुसार, एकादशीच्या दिवशी जल अर्पण केल्याने तसेच दिवा लावल्याने व्यक्तीची प्रत्येक कर्जातून सुटका होते.
जर पैसा मिळत नसेल तर हळदीच्या सात गाठी पिवळ्या रंगाच्या रेशमी कपड्यात बांधून केळीच्या झाडाखाली ठेवाव्यात, काही दिवसातच परिणाम दिसून येतील.
देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 'हे' उपाय करु शकता
जर घरात पैशांची कमतरता असेल तर दोन हळदीच्या गाठी, चांदीचे किंवा साधे एक रुपयाचे नाणे आणि एक पिवळा पैसा पिवळ्या कपड्यात ठेवा. या कापडाचे बंडल बनवा. देवाच्या आशीर्वादाने हे गठ्ठे घ्या आणि ज्या ठिकाणी तुम्ही तुमची संपत्ती ठेवता त्या ठिकाणी ठेवा, संपत्ती वाढेल.
वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी 'हे' उपाय करा
वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी भगवान विष्णू आणि तुळशीच्या झाडाची विधिवत पूजा करा आणि वेलची जोडी देवाला अर्पण करा. पूजेनंतर वेलची पती-पत्नी दोघांनीही खावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :