Shravan Purnima 2025: हिंदू धर्मातील लोकांसाठी पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यंदाची श्रावण पौर्णिमा अत्यंत खास आहे. ही पौर्णिमा रक्षाबंधनच्या एक दिवस आधी येत आहे, जिला नारळी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या दिवशी चंद्र मकर राशीत भ्रमण करेल. पौर्णिमेला चंद्राची पूर्ण स्वरूपातील स्थिती 12 राशींच्या जीवनावर कसा परिणाम करेल? जाणून घेऊया.

Continues below advertisement


फुल मून 12 राशींच्या जीवनात करणार चमत्कार!


वैदिक पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या पूर्ण स्वरूपात प्रकट होणार आहेत. ज्याला फुल मून असेही म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने या दिवशी खऱ्या मनाने पूजा केली तर त्याला पापांपासून मुक्ती आणि मानसिक शांती मिळते. पंचांगानुसार, यावेळी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमेची तिथी ही 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2:12 ते 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1:24 पर्यंत आहे. अशात उदय स्थितीनुसार 9 ऑगस्ट 2025 रोजी श्रावण पौर्णिमा व्रत केले जाईल. तर 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:21 च्या सुमारास चंद्रोदय होईल.


या राशींवर शुभ प्रभाव


श्रावण पौर्णिमा म्हणजेच या दिवशी पूर्ण चंद्र दिसल्याने वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु आणि मीन राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.


आर्थिक स्थिती


ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा श्रावण पौर्णिमेला या राशींना आर्थिक बाबतीत यश मिळाल्याने तुम्हाला पैशाच्या संकटाचा सामना करावा लागणार नाही. याशिवाय, कर्ज वेळेपूर्वी फेडले जाईल. व्यवसायात नवीन भागीदार सामील होण्याचा फायदा होईल. तुम्हाला जमीन खरेदी करण्याची इच्छा देखील होऊ शकते.


आरोग्य


ज्योतिषशास्त्रानुसार,जर तुम्ही नियमितपणे हिरव्या भाज्या खाल्ल्या तर पोट चांगले राहील. योगा केल्याने मानसिक आरोग्य सुधारेल. याशिवाय, ज्यांना कोणत्याही गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे त्यांच्या आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.


प्रेम जीवन


ज्योतिषशास्त्रानुसार, अविवाहित लोकांचा एखादा जुना मित्र भेटू शकतो, ज्याच्या भेटीमुळे तुम्हाला खूप आनंद होईल. दुसरीकडे, जे लोक स्थायिक झाले आहेत त्यांचे नाते सुधारेल. बोलण्यात गोडवा असल्याने लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. याशिवाय, ते तुमच्यासोबत एकटे वेळ घालवण्याची इच्छा देखील व्यक्त करू शकतात.


'या' राशींवर अशुभ परिणाम


पौर्णिमेला मकर राशीत चंद्राच्या संक्रमणामुळे मेष, मिथुन, सिंह, तूळ, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता नाही.


आर्थिक परिस्थिती


ज्योतिषशास्त्रानुसार, व्यवसायात पूर्वीपेक्षा जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे. वेळेवर कर्ज न फेडल्याने व्याज वाढेल. चुकीच्या भागीदारांशी संबंध ठेवल्याने तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. याशिवाय, व्यवहारात काळजी न घेतल्याने आर्थिक नुकसान देखील होऊ शकते.


आरोग्य


ज्योतिषशास्त्रानुसार, योग्य आहार न पाळल्यामुळे तरुणांचे आरोग्य बिघडू शकते. मुलांना घशाच्या समस्या असू शकतात. तर ज्येष्ठांना पाठ आणि पाय दुखण्यामुळे त्रास होईल. याशिवाय अपघात होण्याचीही शक्यता आहे.


प्रेम जीवन


ज्योतिषशास्त्रानुसार, आजकाल अविवाहित लोकांच्या जीवनात प्रेम दार ठोठावण्याची शक्यता नाही. उलट, छोट्या छोट्या गोष्टींवरून कुटुंबातील सदस्यांशी वाद होऊ शकतात. तर विवाहित जोडप्यांमध्ये मतभेद वाढतील आणि घरातील वडीलधाऱ्यांशी भांडणे होतील. यामुळे घरात तणावाचे वातावरण राहील. याशिवाय, तुम्हाला जास्त धावपळ करावी लागू शकते.


हेही वाचा :           


Lakshmi Narayan Yog 2025: जन्माष्टमीनंतर 'या' 5 राशींकडे चुंबकासारखा पैसा खेचला जाईल! जबरदस्त लक्ष्मी नारायण योग बनतोय, कुबेराचाही हिरवा सिग्नल!


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)