एक्स्प्लोर

Shravan 2024 : आज श्रावणातील तिसरा सोमवार; महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी?

Shravan 2024 : आज श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवामूठ वाहिली जाते. आज तिसऱ्या सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहिली जाणार? जाणून घेऊया.

Shravan 2024 : श्रावण (Shravan 2024) महिन्यात अनेक व्रत वैकल्य असतात. यंदा श्रावणात 5 सोमवार असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला शिवमूठ (Shiva Muth) वाहिली जाते. प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवमूठ महादेवाला अर्पण केली जाते. त्यानुसार 19 ऑगस्टला आलेल्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवमूठ अर्पण करावी? जाणून घेऊया.

तिसऱ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ? (Shravan 2024 Second Shiva Muth)

श्रावण महिन्यात दर सोमवारी शंकराला शिवामूठ वाहली जाते, त्याप्रमाणे शंकराला तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूगाची शिवामूठ (Moong Shiva Muth) वाहायची आहे.

यंदा श्रावणात किती सोमवार आणि कोणती शिवमूठ वाहावी?

पहिला सोमवार – 05 ऑगस्ट, पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावी.
दुसरा सोमवार – 12 ऑगस्ट, दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ वाहावी.
तिसरा सोमवार – 19 ऑगस्ट, तिसऱ्या सोमवारी शिवामूठ मूग वाहावी.
चौथा सोमवार – 26 ऑगस्ट, चौथ्या सोमवारी शिवामूठ जव वाहावी.
पाचवा सोमवार – 02 सप्टेंबर, पाचव्या सोमवारी शिवामूठ हरभरा वाहावी.

श्रावणी सोमवारी शंकराच्या आराधनेसाठी त्याला बेल, दूध अर्पण केलं जातं आणि त्यानंतर शिवमूठ अर्पण केली जाते. प्रत्येक सोमवारी एक वेगळी शिवमूठ असते.

शंकराची पूजा कशी करावी?

प्रत्येकाने आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शंकराच्या फोटोची पूजा करावी. शंकराचा फोटोसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी. ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकता.

शिवामूठ व्रत करण्याची पद्धत

विवाहानंतर पहिली पाच वर्षं श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केलं जातं. श्रावण मासात येणार्‍या चार/पाच सोमवारी चार/पाच प्रकारचं धान्य शिवाला अर्पण केलं जातं. विवाहानंतरची पहिली पाच वर्षं क्रमवार हे व्रत केलं जातं.

श्रावण मासात कोणकोणते सण-व्रत साजरे केले जाणार?

या पवित्र मासात श्रावणी सोमवार, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचं व्रत, अशी अनेक व्रतं केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत केलं जातं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Shravan 2024 : तब्बल 71 वर्षांनंतर यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारपासून; 'या' 4 राशींचं नशीब पालटणार, महादेवाच्या कृपेने होणार अपार धनलाभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSiddhiVinayak Ganpati Aarti : सिद्धीविनायक गणपती आरती 12 सप्टेंबर 2024 ABP MajhaTOP 70 : 07 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaABP Majha Headlines : 07.00 AM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Mumbai Lottery 2024 : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज आले? किती जणांनी अनामत रक्कम भरली? आकडेवारी समोर
मुंबईतील 2030 घरांसाठी किती अर्ज दाखल? अनामत रक्कम किती जणांनी भरली? म्हाडाकडून आकडेवारी समोर
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची बांधकामे नियमित होणार, मुख्यमंत्र्यांकडे लवकरच प्रस्ताव
Amitabh Bachchan Signature Style Origin : भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
भाजलेल्या हातामुळे मिळाली बिग बींना मिळाली आपली सिग्नेचर पोझ; जाणून घ्या किस्सा...
Rahu 2024 : राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
राहूची ताकद 10 पटीने वाढली; 2025 पर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन, नवीन नोकरीसह होणार भरघोस धनलाभ
Bhavana Gawali : भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
भावना गवळी विधानसभेच्या रिंगणात? पक्षाने आदेश दिल्यास रिसोड मतदारसंघातून निवडणूक लढवणार
Astrology : यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
यंदाचं गौरी पूजन 3 राशींसाठी ठरणार खास; 11 सप्टेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
एक दिवस संसार टिकला, नागपूरच्या युवकाला पत्नीला 50 लाखांची पोटगी द्यावी लागली, न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयात किस्सा सांगितला
एक दिवसाचा संसार महागात पडला, 50 लाखांची पोटगी देण्याची वेळ, नागपूरच्या युवकाचा किस्सा सर्वोच्च न्यायालयात चर्चेत
Mangal Gochar 2024 : तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
तब्बल 18 महिन्यानंतर मंगळाचा नीच्च राशीत प्रवेश; 3 राशींचं भाग्य उजळणार, धन-संपत्तीत होणार अपार वाढ
Embed widget