Shravan 2022 : शिवभक्तीसाठी श्रावण महिना श्रेष्ठ मानला जातो. श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वतीची पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो, सर्व सुखांची प्राप्ती होते.  श्रावणात भगवान शिव अतिशय आनंदी मुद्रेत असतात. त्यांच्या आजूबाजूला खूप ऊर्जा आहे. शास्त्रात असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचा वापर करून घरातील वास्तुदोष दूर करता येतात. जाणून घेऊया ते उपाय


या ठिकाणी श्रावण महिन्याला प्रारंभ, महाराष्ट्रात कधीपासून? 
आषाढ महिन्याच्या पौर्णिमेपासून म्हणजे गुरूपौर्णिमेपासून राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि बिहार येथे श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे परंतू महाराष्ट्रात म्हणजेच पश्चिम आणि दक्षिण भारतात शुक्रवार 29 जुलै 2022 पासून श्रावण मासारंभ होत आहे. हिंदू पंचागांतील श्रावण हा पाचवा महिना आहे.


श्रावणात या उपायांनी घरातील वास्तुदोष दूर होतील


गंगाजल शिंपडणे


शिवाला पाणी फार प्रिय आहे. श्रावणी सोमवारच्या पूजेमध्ये शिवलिंगावर गंगाजलाचा अभिषेक अवश्य करा, यामुळे भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि सर्व संकटांपासून मुक्त होतात. श्रावणात नियमितपणे घरात गंगाजल शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात. कुटुंबातील सुख-शांती भंग पावत नाही.


पाण्याचा करंजा


श्रावण महिन्यात उत्तर किंवा पूर्व दिशेला कृत्रिम पाण्याच्या कारंज्यासारखे जलस्रोत ठेवणे शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. नकारात्मकता निघून जाते. भाग्य आणि समृद्धी वाढते.


गृहकलहापासून मुक्तता


जर तुम्हाला आरोग्याचे वरदान, घरातील संकटांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर सोमवारी श्रावणात घराच्या ईशान्य कोपर्‍यात रुद्राभिषेक करा.


पैशाची समस्या


आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला बेलपत्राचे रोप लावावे. त्यांना रोज पाणी अर्पण करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. त्यामुळे कधीही गरिबी येणार नाही.



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


हेही वाचा :