Shiv Jayanti 2024 Rangoli Designs idea : शिवजयंती (Shiv Jayanti 2024) सोहळा हा प्रत्येक शिवभक्तासाठी खास असतो. यंदा गुरुवारी, 28 मार्चला तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. हिंदू धर्मात एखादा सण उत्सव आला की रांगोळी काढण्याची सांस्कृतिक परंपरा आहे. तुम्ही देखील यंदाच्या शिवजयंतीला अशाच काही सोप्या रांगोळी डिझाईन्स काढू शकता. कमी वेळात काढता येतील अशा आकर्षक रांगोळ्या (Shiv Jayanti Easy And Simple Rangoli Designs) पाहूया.


शिवजयंती सोप्या रांगोळी डिझाईन्स (Shiv Jayanti Simple Rangoli Designs)




छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही असा एक सोपासा मुकूट आणि भगवा काढू शकता, त्यावर शिवजयंती हे अक्षर रेखाटू शकता. ही रांगोळी अगदी सोपी आणि मोजक्या अशा रंगातून रेखाटण्यात आली आहे. घराच्या दारात तु्म्ही ही सोपी रांगोळी काढू शकता.




याहून सोपी रांगोळी काढायची असल्यास तुम्ही साधा भगवा आणि तलवार, त्याखाली राजे असं लिहू शकता. ही रांगोळी काढायला काहीशी मिनिटं पुरेशी आहेत.




यानंतर तुम्ही अशा प्रकारच्या आकर्षक फुलांच्या डिझाईन्सने साधी सोपी रांगोळी काढू शकता आणि त्यात शिवरायांचं एखादं नाव रेखाटू शकता.




छत्रपती शिवरायांची ही रांगोळी मन मोहून टाकणारी आहे, अवघ्या 4 रंगांचा वापर करुन ही रांगोळी साकारण्यात आली आहे.




आणखी एक सुबक प्रतिकृती साकारायची असल्यास तुम्ही ही रांगोळी काढू शकता. किल्ला आणि तिरंगा काढून तुम्ही ही रांगोळी साकारू शकता.



शिवजयंतीचा इतिहास (Shiv Jayanti History)


वैभव, शौर्य, दया आणि औदार्य यांचं प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 1870 पासून साजरी करण्यास सुरुवात झाली. सर्वात आधी पुण्यात महात्मा ज्योतिराव फुले यांनी हा दिवस शिवजयंती म्हणून साजरा केला. पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगडावर त्यांनी आपल्या लाडक्या राजाची समाधी शोधून काढली. नंतर लोकमान्य टिळकांनी शिवजयंती साजरी करण्याची परंपरा पुढे नेली.


लोकमान्य टिळक त्या काळात जनतेला सोबत घेऊन ब्रिटिश राजवटीविरुध्द लढा देत होते. याचाच एक भाग म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जावी, असं आवाहन त्यांनी जनतेला केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची किर्ती आणि शौर्य देशातील तरुणांना आणि जनतेला नेहमीच प्रेरणा देत राहो, यासाठी दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. परंतु, आता शिवजयंती फक्त देशातच नव्हे, तर विदेशातही साजरी केली जाते.


हेही वाचा:


Shivaji Maharaj Baby Names : शिवांश ते हिंदवी... शिवजयंतीला जन्मलेल्या बाळांसाठी 'ही' 10 नावं आहेत बेस्ट, तुम्हालाही वाटेल अभिमान!