Shardiya Navratri 2024 : सगळीकडे शारदीय नवरात्रीचा (Shardiya Navratri 2024) जल्लोष सुरु आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस संपायला अवघा एक दिवस बाकी आहे. त्यानुसार, विजयादशमीनंतर नवरात्रीची सांगता होते. यामध्ये देखील अष्टमी आणि नवमी तिथीला फार महत्त्व आहे. या दिवशी कन्या पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी कुमारिकांना घरी बोलावून त्यांना जेवण दिलं जातं. तसेच, त्यांची पूजा केली जाते. त्यानुसार, नवमी तिथीचा शुभ मुहूर्त काय आहे ते जाणून घेऊयात. 


शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. देवीची भक्तिभावाने पूजा, आराधना केली जाते. तिच्या मंत्राचा जप केला जातो. या दरम्यान घरात सकारात्मक वातावरण असते. तसेच, नवरात्रीला अष्टमी आणि नवमी तिथीचेसुद्धा फार महत्त्व आहे. अष्टमी आणि नवरात्रीच्या दिवशी कन्या पूजन केले जाते. या दिवशी कुमारिका मुलींना घरी बोलावून त्यांना जेवू घातलं जातं. यंदाची नवमी तिथी कधी आहे ते पाहूयात. 


नवरात्रीची नवमी तिथी कधी? 


नवरात्रीची अष्टमी आणि नवमी तिथी एकाच दिवशी असणार आहे. त्यानुसार, यंदा ही तिथी 11 ऑक्टोबर रोजी म्हणजेच शुक्रवारी साजरी करण्यात येणार आहे. नवरात्रीची नवमी तिथी ही देवी दुर्गेला समर्पित आहे. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. नवरात्रीत नवव्या दिवशी कन्या पूजनाबरोबरच देवीचे हवन आणि पूजन केले जाते. या दिवशी देवीच्या सिद्धीदात्री रुपाची पूजा करतात. 


शारदीय नवरात्रीची सप्तमी तिथी 9 ऑक्टोबरला बुधवारी सकाळी 7 वाजून 36 मिनिटांनी सुरु होईल आणि 10 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजून 29 मिनिटांपर्यंत राहिल. अष्टमी तिथी 10 ऑक्टोबरला म्हणजेच आज सकाळी 7 वाजून 29 मिनिटांपासून सुरु होईल तर 11 ऑक्टोबरला सूर्योदयानंतर 6 वाजून 52 मिनिटांनंतर नवमी तिथी सुरु होईल. नवमी तिथी ही दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजून 47 मिनिटांपर्यंत राहिल. त्यामुळे अष्टमी आणि नवमी तिथीचे व्रत एकाच दिवशी असणार आहे.


हवन आणि कन्या पूजन मुहूर्त 2024


नवरात्रीच्या नवमीला दुर्गा देवीच्या पूजेसोबत भक्तगण हवन आणि पूजा देखील करतात.
शुभ मुहूर्त
सकाळी 6 वाजून 19 मिनिटांपासून ते 7 वाजून 47 मिनिटांपर्यंत - सामान्य
सकाळी 7 वाजून 46 मिनिटांपासून ते 9 वाजून 13 मिनिटांपर्यंत
सकाळी 9 वाजून 13 मिनिटांपासून ते 10 वाजून 40 मिनिटांपर्यंत - अमृत
दुपारी 12 वाजून 7 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत - शुभ


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shukra Gochar 2024 : अवघ्या 3 दिवसांनी शुक्राचं राशी परिवर्तन; मेषसह 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार वाढ, राहा सतर्क