Shardiya Navratri 2022 : धार्मिक ग्रंथानुसार नवरात्रीचे (Navratri 2022) नऊ दिवस शुभ मानले जातात. त्यामुळे जे लोक लग्नासाठी वधू किंवा वर पाहण्याची योजना आखत आहेत, त्यांनी हे जाणून घेणं गरजेचं आहे.
नवरात्रीचे नऊ दिवस शुभ मानले जातात
पितृ पक्ष अमावस्येनंतर शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला येतो. या दिवशी लोक घरी कलशाची स्थापना करतात आणि नऊ दिवसांचे व्रत सुरू होते. ज्यांना संपूर्ण नऊ दिवस उपवास करता येत नाहीत, ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि अष्टमीला तरी उपवास करतात. नवरात्रीचे नऊ दिवस खूप शुभ मानले जातात. ज्या लोकांना लग्नासाठी वधू किंवा वर पाहण्याची योजना आखत आहेत, त्यांनी या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.
शारदीय नवरात्रीच्या या शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊ शकता
नवरात्रीच्या नऊ तिथी अशा आहेत, ज्यामध्ये कोणतेही शुभ कार्य मुहूर्त न पाहताही करता येतात. म्हणजेच तुम्ही वधू किंवा वर पाहण्यासाठी जाणार असाल, ते या शारदीय नवरात्रीच्या शुभ मुहूर्ताचा लाभ घेऊ शकतात. धार्मिक ग्रंथांनुसार, नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच प्रतिपदा सोडली तर तुम्ही मुलीला किंवा वराला भेटण्यासाठी जाऊ शकता आणि त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित करू शकता. वधू-वरांना भेटायला जाताना भद्रा, दिशाशूळ यांची जरूर काळजी घ्यावी. धार्मिक मान्यतांनुसार, या काळा दरम्यान कोणत्याही शुभ कार्यासाठी घराबाहेर पडू नये. तसेच नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथी वधू किंवा वर पाहण्यासाठी सर्वोत्तम आहेत. याशिवाय, नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर लोक कोणताही नवीन व्यवसाय सुरू करतात किंवा त्यांच्या नवीन घरात प्रवेश करतात.
वाईटावर चांगल्याचा विजय - नवरात्रीचे महत्व
शारदीय नवरात्र हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगतात. हा दिवस देवी दुर्गाच्या शक्तीचे प्रतिक मानला जातो. आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर महिषासुराची दहशत खूप वाढली तेव्हा सर्व देवी-देवतांनी त्रिदेवांकडे मदत मागितली, परंतु ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे त्रिदेवांनी असमर्थता व्यक्त केली. यानंतर त्रिदेवांनी त्यांच्या शक्तीने माता दुर्गेची निर्मिती केली. सर्व देवतांनी आपली शक्ती आणि शस्त्रे माता दुर्गाला दिली. यानंतर देवू दुर्गेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले. दहाव्या दिवशी त्याचा वध केला. देवी दुर्गेच्या शक्तीने देवांनाही आश्चर्यचकित केले. तेव्हापासून नवरात्रीचे नऊ दिवस शक्तीच्या उपासनेसाठी समर्पित मानले जातात आणि दहाव्या दिवशी दसरा उत्सव साजरा केला जातो. ज्योतिषी सांगतात की, रावणाचा वध करण्यापूर्वी भगवान श्रीरामांनीही देवी दुर्गेची पूजा केली होती आणि विजयी होण्याचे आशीर्वाद घेतले होते. यानंतर दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध करण्यात आला.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या