Shani Dev : शनिवारचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे, या दिवशी शनीची पूजा करण्याची परंपरा आहे.  शनिदेवाला प्रसन्न ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. धार्मिक मान्यतेनुसार, ज्यांच्यावर शनीची साडेसाती आहे त्यांनी गरजूंना मदत करावी. त्याचबरोबर शनीच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही आणखी उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याचं पालन केल्यास माणसाला फायदा होतो आणि सर्व समस्या दूर होतात. 


ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय देवता म्हटलं जातं. शनिदेव आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. न्यायदेवतेची पूजा केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव दूर होतो, असं मानलं जातं. शनिवारी शनिदेवाची पूजा केल्याने माणसाचे सर्व कष्ट दूर होतात. शनीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करता येतात, याबद्दल जाणून घेऊया.


शनिवारी करा या गोष्टी


गरिबांना अन्नदान करा


शनिवारी भुकेल्यांना खाऊ घाला. असहाय्य लोकांना मदत केल्याने सूर्यपुत्राचा आशीर्वाद मिळतो असं म्हणतात, तसेच जीवनात आनंद टिकून राहतो. गरीब आणि गरजूंना मदत करणाऱ्यांवर शनिदेवाची विशेष कृपा असते.


असे कपडे घाला


शनिवारी निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालावेत, असं सांगितलं जातं. असं केल्याने प्रत्येक कामात यश मिळतं, तसेच करिअरमध्ये प्रगती होते, त्यामुळे शनिवारी गडद रंगाचे कपडे घाला.


शनीची पूजा


शनिवारी शनिदेवाची योग्य प्रकारे पूजा करा, शनि मंत्रांचा जप करा आणि चालीसा पठण करा, असे केल्याने छायापुत्र आनंदी होतात आणि फळ देतात. शनीची पूजा केल्याने तुमच्या नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुमच्या कुटुंबात समृद्धी येईल. ज्योतिषींच्या मते, शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर मोहरीचे तेल अर्पण करावे. तेल अर्पण करताना शनिदेवाच्या चरणी तेल अर्पण करावे हे ध्यानात ठेवावे. काळे वस्त्र दान करावे. त्या दिवशी कोणालाही त्रास देऊ नये.


शनि मंत्राचा जप करा


ज्योतिषशास्त्रानुसार, शनि मंत्राचा जप करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. शनि मंत्राचा जप केल्याने शनि खूप प्रसन्न होतात आणि जीवनात येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळवून देतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology: करिअर, नोकरी, व्यवसायात अडचणी येत आहेत? शुक्र,शनी आणि दोन मायावी ग्रह आहेत कारणीभूत, जाणून घ्या उपाय