Astrology: ज्योतिष शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या 9 ग्रहांच्या (Navagraha) स्थितिवरच आपले जीवन अवलंबून आहे. सूर्य, चंद्र, मंगळ,बुध बृहस्पति, शुक्र, शनि, राहू, केतू हे नऊ ग्रह असून प्रत्येकाचा प्रभाव वेगवेगळा असतो. आपल्या कुंडलीत जो ग्रह चांगल्या स्थितीत असतो तो आपल्याला चांगले फळ देतो. आणि जो ग्रह कुंडलीत अशुभ स्थितीत असतो तो वाईट फळ देतो. राहू आणि केतू (Rahu Ketu) हे दोन्ही छाया ग्रह मानले जातात. राहू आणि केतूला पापी ग्रह असे देखील म्हणतात. नोकरी, करिअर, पैशासंबंधी जर कोणती अडचण येत असेल तर यामध्ये शुक्र, शनि आणि राहू- केतूची मुख्य भूमिका असते.
शुक्, शनि आणि राहू- केतू
शुक्र - शुक्र ग्रह हा प्रेम, वैभव आणि भौतिक सुख सुविधा देणारा ग्रह मानला जातो. शुक्र ग्रहाचा प्रिय वार शुक्रवार असून प्रिय रंग पांढरा आहे. शुक्र ग्रहाचे आराध्य देवी दुर्गामाता आहे.
शनि - शनि हा कर्मप्रधान ग्रह आहे. शनि प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. शनिचा आवडता रंग नीळ आणि आराध्य देव भगवान शंकर आहे.
राहू- राहुचा आवडता रंग काळ आहे. तसेच आराधय दैवत सरस्वती आहे.
केतू - केतूचा आवडता रंग पांढरा आणि आराध्य दैवत गणपती आहे,
शुक्र, शनि, राहू आणि केतूचा प्रभाव काय?
शुक्र : जक एखाद्य व्यक्तीच्या कुंडलीमध्ये धन, वैभव, ऐश्वर्य आणि भौतिक सुखाचा अभाव असतो याचा अर्थ त्या कुंडलीतील शुक्राची स्थिती कमजोर असते.
शनि : शनिचा अशुभ प्रभाव असणाऱ्या व्यक्ती कर्जात बुडालेल्या असतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने धन- संपत्तीचा नाश होत असतो. तसचे प्रगत थांबते. या व्यक्तींच हा परीक्षेचा काळ असून खूप मेहनत घ्यावी लागते.
राहू - राहूला पापी ग्रह असेही म्हणतात. या ग्रहामुळे माणसाच्या जीवनावर खूप अशुभ प्रभाव पडतो. राहुचा प्रभाव इतका तीव्र असतो की त्याच्या प्रभावामुळे गुरू ग्रहापासून शुभ प्रभाव मिळणे बंद होते. राहुच्या प्रभावामुळे अनेकांचे करिअर खराब होते.
केतू - राहूप्रमाणे केतूला देखील मायावी ग्रह देखील म्हटले जाते. केतूच्या प्रभावामुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या वाढत जातात. व्यक्तीच्या आयुष्यात इतक्या समस्या येतात की, त्याची झोप उडते. पद, प्रतिष्ठा आणि संतान सुख मिळत नाही.
शुक्र, शनि, राहू आणि केतूचा प्रभाव कमी करण्यासाठीचे उपाय
शुक्र ग्रहासाठी उपाय
शुक्रवार आणि पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा. या दिवशी साखर, मैदा, पांढरे वस्त्र, तांदूळ, दही, दूध किंवा मोती इत्यादी पांढऱ्या वस्तूंचे दान करा. यामुळे सुख आणि सौभाग्य वाढेल. आर्थिक लाभासाठी शुक्रवारी मुंग्यांना पीठ खाऊ घाला. पाण्यात वेलची मिसळून आंघोळ केल्यानेही शुक्र ग्रह मजबूत होतो.
शनि ग्रहासाठी उपाय
शनिवारी आणि अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला कच्च्या दुधात पाणी मिसळून अर्पण करावे. तीळ किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिवारी मांसाहार किंवा मद्य सेवन करू नका. शनिवारी ॐ प्रां प्रीं प्रौं स: शनैश्चराय नम:या मंत्राचा जप केल्याने शनि शांत होतो आणि संकट दूर होते.
राहूचा दोष दूर करण्याचा उपाय
राहुची स्थिती कमकुवत असताना निळ्या रंगाचे कपडे घाला आणि मद्य किंवा मांसाहार टाळा. राहुची महादशा दूर करण्यासाठी शिवपुराण वाचावे
केतु ग्रहासाठी उपाय
केतूचा दोष असेल तर तो दूर करण्यासाठी घोंगडी, छत्री, वस्त्र, लोखंड, उडीद, लसूण इत्यादी दान करा. केतू दोष असल्यास केतू यंत्र, केतू मंत्र आणि गणपतीची पूजा करणे फायदेशीर आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :