Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) नवीन वर्षात कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्याचबरोबर, 2025 मध्ये शनीची (Lord Shani) उलटी चालसुद्धा खास असणार आहे. नवीन वर्षात शनी 138 दिवसांपर्यंत उलटी चाल चालणार आहे. शनी 13 जुलैपासून ते 28 नोव्हेंबरपर्यंत वक्री चाल चालणार आहेत. त्यामुळे शनीची वक्री चाल 3 राशींच्या अडचणी वाढवू शकते. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
यावर्षी शनीच्या उलट्या चालीमुळे वृषभ राशीच्या लोकांना सावध राहण्याची गरज आहे. याचं कारण म्हणजे नवीन वर्षात शनीच्या वक्री चालीमुळे तुमच्या व्यवसायात मोठं नुकसान होऊ शकतं. तसेच, तुमची आर्थिक स्थिती खालावू शकते. त्याचबरोबर याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. वैवाहिक नात्यात वाद निर्माण होऊ शकतात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
शनीच्या वक्री चालीमुळे नोकरदार वर्गातील लोक तसेच व्यावसायिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुमच्या घरात ज्येष्ठ व्यक्तीच्या आजारात चढ-उतार जाणवू शकतात. तसेच, तुमच्या कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीच्या संदर्भात नुकसान देखील होऊ शकतं. त्यामुळेच या काळात कोणतीही नवीन प्रॉपर्टी विकत घेऊ नका.
सिंह रास (Leo Horoscope)
नवीन वर्षात शनीच्या वक्री चालीमुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ नाही. या काळात तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमचं आरोग्य बिघडू शकतं.तुम्हाला नोकरीत बदल करावा लागू शकतो. यासाठी कोणताही निर्णय घेताना सावध राहा. कारण यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: