Shani Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेवाला कर्माचा दाता म्हटले जाते. शनिला न्यायाची देवता देखील म्हटले जाते. कारण शनिदेव हे प्रत्येकाच्या कर्मानुसार फळ देतात आणि न्याय करतात. त्यामुळेच त्यांना हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. याशिवाय शनिदेव हे दु:ख, मृत्यू, शोक आणि रोग देणारा देखील मानले जातीत, ज्याचा मिश्र प्रभाव वेळोवेळी सर्व राशींवर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय? जाणून घ्या..
शनीने संक्रमण कधी केले?
वैदिक दिनदर्शिकेनुसार 2 फेब्रुवारी 2025 रोजी शनीने पूर्वाभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. शनीचा हा नक्षत्र परिवर्तन रविवारी सकाळी 8.51 वाजता झाला. जाणून घेऊया कोणत्या तीन राशींवर शनीच्या या राशी बदलाचा सर्वात जास्त अशुभ प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
वृषभ - आर्थिक स्थितीवर परिणाम होणार?
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि संक्रमणाचा सर्वात अशुभ प्रभाव वृषभ राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर होईल. व्यावसायिकांच्या खर्चात अचानक वाढ होईल, ज्यामुळे त्यांचे बजेट असंतुलित होऊ शकते. नोकरदार लोकांना चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्याने नुकसान होईल. याशिवाय कार्यालयात कर्मचाऱ्यांशी वादही होऊ शकतात, त्यामुळे मानसिक तणाव निर्माण होईल. जे विवाहित आहेत किंवा नातेसंबंधात आहेत त्यांचे त्यांच्या सोबत्याशी मतभेद असू शकतात.
कुंभ - कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील?
कुंभ राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडू शकते. शनि संक्रमणाच्या अशुभ प्रभावामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. मित्रांसोबत लांबच्या सहलीला जाण्याचे बेत रद्द होऊ शकतात, त्यामुळे कुंभ राशीचे लोक नाराज राहतील. हुशारीने गुंतवणूक करूनही व्यावसायिकांना नुकसान सहन करावे लागू शकते. नोकरदार लोकांसाठी यावेळी खर्च करणे चांगले नाही. विवाहित लोकांची उधळपट्टी वाढल्याने बजेट बिघडू शकते.
मीन - कामे वेळेवर पूर्ण करण्यात अडचण?
शनि संक्रमणाच्या अशुभ प्रभावामुळे वृद्ध लोकांचे आरोग्य बिघडू शकते. याशिवाय जुन्या आजाराचा त्रासही तुम्हाला सतावेल. आर्थिक नियोजनाकडे लक्ष न दिल्याने दुकानदारांना पैशांची टंचाई भासणार आहे. नोकरदार लोकांचे सहकारी आणि अधिकारी यांच्याशी वाद होऊ शकतात, त्यामुळे तणाव राहील आणि कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. व्यावसायिक कोणतेही महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण करू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांचे आई-बहिणीशी वाद होऊ शकतात.
हेही वाचा>>>
Shani Dev: सतत पैशांची अडचण येतेय? शनिवारी गुपचूप करा हे '4' उपाय, शनिदेवाची विशेष कृपा अन् पैसाच पैसा? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )