Fan Kissing Guru Randhawa Video Viral : प्रसिद्ध बॉलिवूड उदित नारायण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या व्हिडीओमुळे चर्चेत आहे. एका व्हायरल व्हिडीओमध्ये उदित नारायण हे महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदित नारायण यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. उदित नारायण यांनी इतक्या वर्षात मिळवलेली प्रतिष्ठा धुळीला मिळवल्यातचं बोललं जात आहे. यादरम्यान, आता गायक गुरु रंधावा याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये महिला चाहती गायक गुरु रंधावाला किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावरही नेटकऱ्यांनी उदित नारायण यांच्यावर निशाणा साधला आहे.
उदित नारायणनंतर गुरु रंधावाचा व्हिडीओ व्हायरल
उदित नारायण यांचा सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका महिला चाहतीच्या ओठांवर किस करताना किस करताना दिसत आहेत. सेल्फी काढताना महिला उदित यांच्या गालावर किस करते, यावेळी ते महिलेला जबरदस्ती किस करताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर बझ क्रिएट झाली आहे. सर्वत्र या व्हिडीओची चर्चा असून नेटकऱ्यांनी उदित नारायण यांना निशाण्यावर धरलं आहे. यादरम्यान, पंजाबी गायक गुरु रंधावा याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सेल्फी काढताना तरुणी त्याला किस करते, पण यानंतर त्याने दिलेल्या रिॲक्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. याची तुलना आता नेटकरी उदित नारायण यांच्या व्हिडीओशी करत आहेत.
गुरु रंधावाचा व्हिडिओ चर्चेत
गुरु रंधावाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, काही लोकांनी उदित नारायणला 'त्याच्या चाहत्यांच्या वेडेपणाला' कसे प्रतिसाद द्यायचा हे शिकवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओमध्ये, एक महिला चाहती स्टेजवर जाते आणि गुरु रंधावाला भेटवस्तू देते आणि नंतर त्याला मिठी मारते. यानंतर, गायकाचा हा चाहता त्याच्यासोबत सेल्फीची विनंती करतो आणि सेल्फी काढताना ती गायकाच्या गालावर चुंबन घेते. यावर गायक चाहत्यापासून अंतर राखतो.
गुरु रंधावाचं चाहत्यांनी केलं कौतुक
गुरु रंधावाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते त्याचं कौतुक करताना थकत नाहीत. व्हिडीओवर कमेंट करताना एका युजरने लिहिलं आहे की 'त्याने त्याचे पाय मागे घेतले... खूप छान.' दुसऱ्या एका युजरने लिहिलंय 'चाहत्यांनीही त्यांच्या मर्यादा जपली पाहिजे.' आणखी एकाने लिहिलंय 'उदित जी, तुम्ही व्हिडीओ काळजीपूर्वक पाहून शिकलं पाहिजे... गुरु रंधावा नेहमीच आवडते... पाजी, तुम्हाला खूप प्रेम आहे.'
नेटकऱ्याने दाखवली महिला चाहत्यांची चूक
एक नेटकऱ्याने लिहिलंय, 'दोन्ही प्रकरणांमध्ये, महिला चाहत्यांनी प्रथम पुढाकार घेतला. जिथे एकाने आपले पाय मागे घेतले, तिथे दुसऱ्याने ते पुढे सरकवले. मी काय म्हणू शकतो? चाहत्यांना असं वाटतं की, जणू काही त्यांना तिचे चुंबन घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. महिला चाहत्यांनी स्वतःला आवरलं पाहिजे आणि कलाकाराच्या वैयक्तिक सीमांचा आदर केला पाहिजे. तुम्ही फक्त कलाकाराला दोष देऊ शकत नाही'.
गुरु रंधावाचा व्हायरल व्हिडीओ पाहा
महत्त्वाच्या इतर बातम्या :