Angarki Chaturthi 2025 :  वैदिक शास्त्रानुसार, अंगारकी चतुर्थी ही एक विशेष आणि वर्षातून फक्त एकदा येते अत्यंत शुभ अशी मानली गेलेली संकष्टी चतुर्थी (Lord Ganesha) असते जी मंगळवारी पडते. ही गणपतीची उपासना करणाऱ्यांसाठी अतिशय प्रभावी आणि फलदायी असते. हा दिवस कोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे या संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. 

अंगारकी चतुर्थी म्हणजे काय?

संकष्टी चतुर्थी दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते.जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा ती अंगारकी चतुर्थी म्हणतात.“अंगारक” म्हणजे मंगळ ग्रहाचा एक नाव. म्हणून मंगळवारी येणारी ही चतुर्थी “अंगारकी” म्हणून ओळखली जाते.ही दिवशी गणपती आणि मंगळ ग्रहाची विशेष कृपा मिळते.

पुढची अंगारकी चतुर्थी कधी आहे?

अगली अंगारकी चतुर्थी : 12 ऑगस्ट 2025 (मंगळवार)

(ही तारीख पंचांगावर आधारित आहे; स्थानिक पंचांगात थोडे बदल असू शकतात.)

मेष रास (Aries Horoscope)

मंगळाचा स्वामी असल्याने उर्जेत वाढ, अडथळ्यांचे निर्मूलन

सिंह रास (Leo Horoscope)

मानसिक स्थैर्य, प्रतिष्ठेत वाढ

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ऋणमुक्तीचे योग

मकर रास (Capricorn Horoscope)

करिअर व व्यावसायिक यश

कुंभ रास (Aquarius Horoscope)

मनोकामना पूर्ण होतात, संकटातून सुटका

अंगारकी चतुर्थीचे उपाय आणि पूजन विधी

सकाळी/सायंकाळी करावयाचे उपाय :

गणपतीचे व्रत/उपवास ठेवा.संकष्टी गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष 11, 21 किंवा 51 वेळा म्हणावे.दूर्वा, शेंदूर व मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा.मंगळ ग्रहासाठी “ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः” हा जप 108 वेळा करा.रक्तवर्णी वस्त्र परिधान करा (मंगळाचे प्रतीक).चंद्र दर्शनानंतर उपवास सोडावा.गणपती मंदिरात लाडू किंवा मोदक दान करावे.

अंगारकी चतुर्थीचे फायदे

संकटांचे निवारणआरोग्य सुधारतेऋणमुक्तीकोर्ट-कचेरीचे प्रश्न मिटतातमानसिक त्रास दूर होतोमंगळदोष कमी होतोविवाहात अडथळे दूर होतात

डॉ. भूषण ज्योतिर्विद

हे ही वाचा :

Numerology : 'भोला भाला सा, सीधा साधा सा'....'या' जन्मतारखेचे लोक असतात फारच साधेभोळे; कोणीही सहज दुखवू शकतं, प्रेमातही कन्फ्युजन