Chandra Grahan : 2025 वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण 'या' 3 राशींना देणार 440 व्हॉल्ट चा झटका; कोसळणार दु:खाचा डोंगर
नवीन वर्ष 2025 चं पहिलं ग्रहण मार्च महिन्यात लागणार आहे. हे चंद्रग्रहण होळीच्या दिवशी असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, होळीच्या दिवशी लागणारं हे चंद्रग्रहण अनेक राशींसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन वर्ष 2025 मध्ये ग्रहांचं संक्रमण आणि ग्रहण दृष्टी फार महत्त्वाची असणार आहे.नवीन वर्षात एकूण 4 ग्रहण लागणार आहेत. यामध्ये पहिलं चंद्रग्रहण 14 मार्च 2025 रोजी होळीच्या दिवशी लागणार आहे. हे चंद्रग्रहण सिंह रास आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात लागणार आहे.
14 मार्च रोजी लागणारं चंद्रग्रहण हे पूर्ण चंद्र ग्रहण असणार आहे. पण, भारतात हे चंद्रग्रहण दिसणार नाही. त्यामुळे भारतात हे सूतक नसणार आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, 14 मार्च रोजी लागणारं चंद्रग्रहण काही राशींसाठी अशुभ असण्याची शक्यता आहे. या काळात त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
पहिलं चंद्रग्रहण सिंह राशीच्या जीवनावर ओढावणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. तसेच, काही आव्हानं समोर असतील.
चंद्रग्रहणाचा नकारात्मक परिणाम मकर राशीच्या लोकांवर देखील होणार आहे. या काळात तुमचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. तसेच, करिअरमध्ये अनेक आव्हानं येतील.
मीन राशीच्या लोकांवर देखील चंद्रग्रहणाचं सावट असणार आहे. या काळात तुमच्यावर अनेक समस्या ओढावू शकतात. ज्याचा तुमच्या वैयक्तिक जीवनावर देखील परिणाम होऊ शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)