एक्स्प्लोर

Shani Pradosh Vrat 2024 : श्रावण महिन्यातील शेवटचं शनी प्रदोष व्रत नेमकं कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा, विधी आणि तिथी

Shani Pradosh Vrat 2024 : पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 17 ऑगस्ट रोजी असणार आहे. त्यानुसार, आज शनी प्रदोष व्रत ठेवलं जाणार आहे.

Shani Pradosh Vrat 2024 : भगवान शंकराला (Lord Shiva) श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. श्रावणात (Shravan) अनेक व्रत-वैकल्य आणि सण-समारंभ साजरे केले जातात. या महिन्यात भगवा शंकर आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. तसेच, श्रावणात येणारा प्रदोष व्रतही फार महत्त्वाचा आहे. मान्यतेनुसार, जे भक्त हे व्रत ठेवतात त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे यंदाचा श्रावणाचा अंतिम प्रदोष व्रत नेमका कधी आहे? तसेच हे व्रत कसं ठेवलं जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 

शनि प्रदोष व्रत कधी?

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 17 ऑगस्ट रोजी असणार आहे. त्यानुसार, आज शनी प्रदोष व्रत ठेवलं जाणार आहे. शनी प्रदोषची सुरुवात सकाळी 8 वाजून 05 मिनिटांनी होणार आहे तर 18 ऑगस्ट रोजी सकाळी 05 वाजून 51 मिनिटांनी या व्रताची समाप्ती होणार आहे. 

या तिथीनुसार प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची विधीवत पूजा केली जाते. या प्रदोष व्रताची वेळ संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांपासून सुरु होऊन ते रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे. तसेच, या काळात भगवान शंकराची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. 

शनी प्रदोष व्रताची शुभ वेळ 2024 (Shani Pradosh Vrat Shubh Muhurta 2024)

ज्योतिष शास्त्रानुसार, श्रावण महिन्यातील अंतिम प्रदोष व्रताच्या दिवशी या वेळी प्रीती योग जुळून येणार आहे. या शुभ योगाची समाप्ती सकाळी 10 वाजून 48 मिनिटांनी होणार आहे. यानंतर, आयुष्मान योग जुळून येणार आहे. हा योग रात्रीपर्यंत असणार आहे. तसेच, या तिथीच्या दिवशी दुर्लभ असा शिवास योगसुद्धा जुळून येणार आहे. असं म्हणतात की, या शुभ समयी भगवान शंकर सकाळी 08.05 मिनिटांपर्यंत कैलाश पर्वतावरच निवास करणार आहेत. तसेच, नंदीवर स्वार करणार आहेत. 

शनी प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त 2024 (Shani Pradosh Vrat Shubh Muhurta 2024)

सूर्योदय - 06 वाजून 04 मिनिटांनी 

सूर्यास्त - 06 वाजून 58 मिनिटांनी 

चंद्रोदय - 05 वाजून 18 मिनिटांनी 

चंद्रास्त - 18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी 

ब्रम्ह मुहूर्त - सकाळी 4.35 पासून ते 5.20 पर्यंत 

विजय मुहूर्त - दुपारी 02.40 ते 3.31 पर्यंत 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 11 August 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Dhanteras 2026: धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची परंपरा नेमकी काय आहे? यामागील धार्मिक महत्त्व कमी लोकांना माहित, जाणून घ्या..
धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याची परंपरा नेमकी काय आहे? यामागील धार्मिक महत्त्व कमी लोकांना माहित, जाणून घ्या..
Baba Vanga: बाबा वेंगाच्या 'नोव्हेंबर 2026' भविष्यवाणीची जोरदार चर्चा! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, तुमची रास?
बाबा वेंगाच्या 'नोव्हेंबर 2026' भविष्यवाणीची जोरदार चर्चा! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, तुमची रास?
Dhanteras 2026: धनत्रयोदशीला 'धणे' पूजनाला मोठं महत्त्व? का करतात धणे पूजन? पूजनाची योग्य पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
धनत्रयोदशीला 'धणे' पूजनाला मोठं महत्त्व? का करतात धणे पूजन? पूजनाची योग्य पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
November 2026 Horoscope: नोव्हेंबर महिना 12 राशींसाठी कसा जाणार? दिवाळीत ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणाला धनलाभ? कोणाला टेन्शन, मासिक राशीभविष्य...
नोव्हेंबर महिना 12 राशींसाठी कसा जाणार? दिवाळीत ग्रहांचे पॉवरफुल योग, कोणाला धनलाभ? कोणाला टेन्शन, मासिक राशीभविष्य...

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
पुणे शिक्षक मतदारसंघ निकाल! काँग्रेसला मोठा धक्का, भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर तर शिवसेनेचे सानप दुसऱ्या क्रमांकावर, विजयासाठी किती मतांची गरज? 
Assembly Elections : अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
अधिकाऱ्यांच्या बदल्या 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा; निवडणूक आयोगाचे पाच राज्यांना कडक आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
पुणे पदवीधर निवडणूक निकाल! हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात कांटे की टक्कर, कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? महत्वाची माहिती समोर 
Imran Khan : इमरान खानला मोठा दिलासा, देश सोडण्याच्या नोटीसला स्थगिती, मुंबई हायकोर्टाचा निर्णय, पुढील सुनावणी कधी?
इमरान खानला मोठा दिलासा,मुंबई हायकोर्टाचा निर्णय, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसला स्थगिती 
Embed widget