Shani Gochar 2025 : शनीच्या वाईट प्रकोपाला सर्वच जण घाबरतात. ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani 2025) खूप महत्त्वाचं स्थान आहे. ज्योतिषशास्त्रात शनि हा क्रूर आणि कठोर ग्रह म्हणून ओळखला जातो, यामुळेच शनीला सर्वजण घाबरतात. कर्माचे फळ देणाऱ्या शनिदेवाचा आशीर्वाद आपल्यावर असावा,अशी प्रत्येकाची इच्छा असते. शनीचा आशीर्वाद असेल तरच सर्व गोष्टी सुफळ संपन्न होतील, असा अनेकांचा समज असतो.


यातच तब्बल दीड वर्षांनंतर शनि रास बदलणार आहे. शनीच्या राशी परिवर्तनानंतर अनेक राशींना चांगले दिवस येतील, तर काही राशींना साडेसातीचा सामना करावा लागेल. 28 मार्च 2025 रोजी शनि मीन राशीत प्रवेश करेल, सध्या तो स्वत:च्या कुंभ राशीत आहे. शनि कुंभ राशीत असेपर्यंतचा 86 दिवसांचा काळ काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे, या लकी राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


शनीची कुंभ राशीतील उपस्थिती मेष राशीसाठी विशेष फलदायी ठरेल. पुढील 86 दिवस तुमच्यासाठी आनंदाचे असतील. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. घर खरेदीची योजना बनू शकते. अनावश्यक तणावापासून दूर राहिल्यास यश मिळू शकते. व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होऊ शकतो. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. प्रेमसंबंध चांगले राहतील. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. समाजात मान-सन्मान वाढेल.


सिंह रास (Leo)


28 मार्चपर्यंतचा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी खास असेल. नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. कामात तुमची प्रगती होऊ शकते, पगार वाढू शकतो. व्यावसायिकांना विशेष लाभ मिळतील, तुम्ही आणखी काहीतरी नवीन सुरू करू शकता जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पती-पत्नीमधील संबंध सुधारतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यश मिळवण्याच्या नवीन संधी प्राप्त होतील.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांना शनीच्या कुंभ राशीतील उपस्थितीचा फायदा होईल.  हा 86 दिवसांचा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी खूप भाग्याचा ठरेल. तुम्ही वाहन, मालमत्ता किंवा इतर कोणतीही वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता. तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. नोकरदार लोकांसाठी देखील वेळ चांगला राहील ज्यामुळे पदोन्नतीसह उत्पन्न वाढेल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अविवाहितांचा विवाह होण्याची शक्यता आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Yearly Horoscope 2025 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य