Pushpa 2 Box Office Collection Day 28: 'पुष्पा 2: द रूल'ची (Pushpa 2 The Rule) हव्वा अजूनही बॉक्स ऑफिलवर (Box Office) कायम आहे. पुष्पाच्या जादूनं भल्या भल्या दिग्गजांची झोप उडवली आहे. तर, अनेक बिग बजेट चित्रपटांनी रचलेली रेकॉर्ड धुळीत मिळवले आहेत.  अल्लू अर्जुन स्टारर हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. आता या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 28 दिवस उलटले आहेत. रिलीज झाल्यानंतर एवढ्या दिवसांनीही 'पुष्पा 2: द रूल' दररोज बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवत आहे. 


सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'पुष्पा 2: द रूल'नं 27 दिवसांत घरगुती बॉक्स ऑफिसवर एकूण 1171.6 कोटींचं कलेक्शन केलं होतं. अशातच, आता 28व्या दिवशी म्हणजेच, न्यू ईयरच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 13.15 कोटींचा गल्ला जमवला होता. यासोबतच घरगुती बॉक्स ऑफिसवर अल्लू अर्जुनचा चित्रपट 1200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे. 




1200 कोटींच्या उंबरठ्यावर पुष्पा


'पुष्पा 2: द रूल' रिलीजनंतर 25 डिसेंबर रोजी वरुण धवनची फिल्म  'बेबी जॉन' आणि  नाना पाटेकर यांचा 'वनवास' रिलीज झाला. पण, या फिल्म्सचा देखील अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 वर कोणताही परिणाम होऊ शकला नाही. तर, 'पुष्पा 2: द रूल'च्या पुढे 'बेबी जॉन' आणि 'वनवास' अक्षरशः गळपटल्या. 28 व्या दिवसाच्या कलेक्शननंतर 'पुष्पा 2: द रूल'नं भारतात आतापर्यंत एकूण 1184.65 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 




जगभरात इतिहास रचणार 'पुष्पा 2: द रूल'


अल्लू अर्जुन स्टारर फिल्म 'पुष्पा 2: द रूल' वर्ल्डवाइडही रेकॉर्डतोड कमाई करण्याच्या तयारीत आहे. फिल्मनं आतापर्यंत 1760 कोटी रुपयांचं शानदार कलेक्शन केलं आहे. या कलेक्शनसह फिल्म बाहुबली 2 च्या वर्ल्डवाइड कलेक्शनला मात देण्यासाठी सज्ज आहे. प्रभासच्या फिल्मनं जगभरात तब्बल 1788.06 कोटी रुपयांची कमाई केली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


2023 मध्ये रिलीज झालेल्या साऊथ फिल्मनं सालार, डंकीला दिलेली टक्कर; पण कॉन्ट्रोवर्सीमुळे हिरो जेलमध्ये गेला अन्...