Shani Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रात शनीला (Shani 2025) खूप महत्त्वाचं स्थान आहे. ज्योतिषशास्त्रात शनि हा क्रूर आणि कठोर ग्रह म्हणून ओळखला जातो, यामुळेच शनीला सर्वजण घाबरतात. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तींना शुभ फळ देतो. तर इतरांना विनाकारण त्रास देणाऱ्यांवर आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीची वक्रदृष्टी असते.


शनि सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत उपस्थित असून 28 मार्च 2025 पर्यंत शनि याच राशीत असेल, त्यानंतर शनि मीन राशीत प्रवेश करेल. शनि मीन राशीत प्रवेश करेपर्यंतचा 89 दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल. शनि या 3 राशींना भरभरुन यश आणि अपार पैसा देईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


शनीची स्थिती मेष राशीसाठी विशेष फलदायी ठरेल. पुढील 101 दिवस तुमच्यासाठी सुखाचे असतील. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.


सिंह रास (Leo)


कुंभ राशीत असलेला शनि सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची चांगली साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. 101 दिवसांच्या या काळात तुमचं आयुष्य सुख-समृद्धीने भरेल. या काळात गुंतवणूक करणं फायदेशीर ठरेल. मात्र, प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचं गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ उत्तम आहे.


तूळ रास (Libra)


शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायद्याची ठरेल. हा 101 दिवसांचा काळ तूळ राशीच्या लोकांसाठी खूप भाग्याचा ठरेल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. व्यवसायासाठी केलेल्या योजना येत्या वर्षात यशस्वी होतील. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. चांगल्या उत्पन्नाचे साधन उपलब्ध होतील. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani 2025 : 2025 मध्ये 3 राशींवर शनीची वक्री; कोसळणार संकटांचा डोंगर, वाईट काळ होणार सुरू