Shani Margi 2024 : शनि ठराविक काळानंतर आपली चाल बदलतो, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. यानुसार आता 15 नोव्हेंबरला शनि (Shani Margi 2024) कुंभ राशीत मार्गी होईल, सध्या तो याच राशीत वक्री स्थितीत आहे. 15 नोव्हेंबरपासून 1 महिना शनि सरळ चालीत असल्यामुळे या काळात अनेक राशीच्या लोकांचं नशीब उजळू शकतं. या लोकांच्या जीवनातील समस्या संपू शकतात आणि त्यांची भरभराट होऊ शकते, पण या 3 भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


दिवाळीनंतर शनि सरळ चालीत असेल, ज्याचा अफाट फायदा मिथुन राशीच्या लोकांना होईल. या काळात तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुमच्या व्यवसायात वाढ झालेली दिसेल. तुमच्या बँक बॅलन्समध्येही लक्षणीय वाढ होऊ शकते, तुम्हाला नवीन नोकरीच्या ऑफर्स मिळू शकतात. चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. या काळात तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. तसेच यावेळी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला कुटुंबाकडून चांगला पाठिंबा मिळेल. तुम्ही मन भरुन खरेदी करू शकता, कारण तुमची आर्थिक स्थितीही या काळात सुधरणार आहे.


मेष रास (Aries)


दिवाळीनंतर शनि सरळ चाल चालेल, या काळात शनिदेव तुमच्यावर विशेष आशीर्वाद ठेवतील. तुमची सर्व प्रलंबित कामं या काळात पूर्ण होतील. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील मिळू शकतात. तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा असेल आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध पूर्वीपेक्षा चांगले राहतील. तसेच, या काळात तुम्हाला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल. रखडलेली कामं पूर्ण होतील आणि तुमचं आरोग्यही चांगलं राहील.


कुंभ रास (Aquarius)


शनिदेवाची सरळ चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण तुमच्या कुंडलीच्या चढत्या घरात शनिदेव मार्गी होणार आहेत, त्यामुळे या काळात तुमचं जीवन सुधारेल. यादरम्यान तुम्ही अनेक चांगली कामं कराल, तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही फायदे मिळतील. नोकरदारांनी घसघशीत बोनस आणि पगारवाढ मिळू शकते, तुमची यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड ठरेल. तुमचं घर किंवा गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होण्याच्या वाटेवर आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार