Shani Margi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता संबोधलं जातं. शनीच्या चालीत वेळोवेळी बदल होतो, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. मागील काही महिन्यांपासून शनि उलट चाल चालत होता, परंतु आता शनि सरळ चालीत मार्गी झाला आहे. 15 नोव्हेंबरला शनीने सरळ चाल सुरू केली आहे. शनिदेव तब्बल 30 वर्षांनंतर त्यांच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत सरळ चालीत मार्गी झाले आहेत. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकतं. या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होऊ शकते. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मकर रास (Capricorn)
शनिदेवाची सरळ चाल तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून धनाच्या घरात मार्गी झाला आहे. तसेच तो तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्यामुळे, या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक केंद्रित व्हाल. तुम्हाला व्यवसायात नवीन संधी मिळतील, ज्यामुळे उत्पन्नात लक्षणीय वाढ दिसेल. या काळात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि भविष्यात त्याचा चांगला परतावा अपेक्षित आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, तुमच्या बोलण्यामुळे लोक प्रभावित होतील.
मेष रास (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल शुभ ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या घरात गेला आहे, त्यामुळे या काळात तुमचं उत्पन्न प्रचंड वाढू शकतं. तसेच, या काळात नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढेल. व्यवसायाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरतील. नवीन व्यावसायिक संबंधांच्या निर्मितीचा व्यवसायावर सकारात्मक परिणाम होईल. यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच या काळात तुम्हाला शेअर मार्केट, बेटिंग आणि लॉटरीमध्ये नफा मिळेल. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
मिथुन रास (Gemini)
शनीची सरळ चाल तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. या काळात नशीब तुम्हाला साथ देईल. तसेच, यावेळी तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. यावेळी स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकतं. नोकरीत प्रगतीसह पदोन्नतीची संधी मिळेल. बॉस आणि अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. व्यावसायिकांचे व्यावसायिक दौरे फायदेशीर ठरतील. कुटुंबात सलोखा राहील, घरातील वातावरण सकारात्मक राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: