Shani And Surya Margi 2024 : ग्रहांचा राजा सूर्य आणि शनि ठराविक काळानंतर राशी बदलतात. या ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनावर होतो. शनि दीड वर्षांनी आपली रास बदलतो, पण त्याच्या चालीत वेळोवेळी बदल होत असतो. शनि नुकताच 15 नोव्हेंबरला वक्री चाल सोडून सरळ चालीत मार्गी झाला आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी, 16 नोव्हेंबरला सूर्यही वृश्चिक राशीत प्रवेश करेल.


शनीच्या सोबतच सूर्याच्या हालचालीत बदल होत आहे. शनि आणि सूर्य यांच्यात पुत्र-पिता संबंध असूनही त्यांच्यात एकमेकांबद्दल शत्रुत्वाची भावना आहे. तरीही या ग्रहांच्या चालीचा काही राशीच्या लोकांना जबर फायदा होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


दोन मोठ्या ग्रहांच्या चालीत झालेल्या बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. यासोबतच ग्रहांच्या शुभ दृष्टीमुळे तुमच्या जीवनात सुखाच्या सरी येतील. तुमच्या जीवनात आनंद येईल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुम्ही घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी सुवर्ण काळ ठरू शकतो. शनीची चाल या राशीच्या लोकांना खूप लाभ देणार आहे.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांनाही शनि, सूर्याच्या स्थितीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. यासोबतच राहु बाराव्या घरात आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती वेळोवेळी बदलू शकते. सूर्याच्या कृपेने समाजात मान-सन्मान वाढू शकतो. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते.


कन्या रास (Virgo)


शनि तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्या दूर करू शकतो. कन्या राशीचे लोक या काळात आत्मपरीक्षण करतील. तुमची एकाग्रता आणि ज्ञान वाढू शकतं. पाचव्या घरात बुध असल्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता वाढू शकते. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी खूप यश मिळू शकतं. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देताना दिसाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. वाहन, मालमत्ता, कपडे इत्यादी खरेदी करू शकता.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले