एक्स्प्लोर

Shani 2024 : दिवाळीनंतर शनीची सरळ चाल; 'या' 5 राशींना येणार सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह धनात होणार अपार वाढ

Shani 2024 : सध्या वक्री स्थितीत असलेला शनि दिवाळीनंतर मार्गी होईल, ज्यामुळे 5 राशींचा सोन्याचा काळ सुरू होईल. या राशीच्या सर्व अडचणी संपून त्यांना सुखाचे दिवस येतील.

Shani Margi 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, माणसांच्या जीवनावर शनीच्या स्थितीचा मोठा परिणाम होतो. शनि (Saturn) कधी वक्री असतो, तर कधी सरळ चालीत असतो, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. कर्माचे फळ देणारा शनि जूनमध्ये वक्री झाला आहे, जो आता थेट दिवाळीनंतर, म्हणजेच 15 नोव्हेंबरला सरळ चालीत मार्गस्थ होईल. शनीच्या या स्थितीचा परिणाम सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा 5 राशी आहेत, ज्यांना शनीचा आशीर्वाद लाभेल आणि त्यांच्या सुख-संपत्तीत वाढ होईल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास (Gemini)

शनीची सरळ चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल, यासोबतच तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही कामासाठी किंवा व्यावसायिक कारणांसाठी बाहेर प्रवास करू शकता. यावेळी कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि वाहन आणि मालमत्ता खरेदीची शक्यता देखील निर्माण होत आहे. तसेच या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते.

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल लाभाची ठरेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या़ ताकदवान बनाल. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरदार लोकांच्या कामात स्थिरता राहील, पदोन्नतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. किरकोळ व्यवसायाशी संबंधित लोकांना फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. धार्मिक कार्यात रुची वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य चांगलं राहील.

तूळ रास (Libra)

तूळ राशीला दिवाळीनंतरच्या काळात शनिदेव मेहनतीचं फळ देईल. यावेळी व्यापारी नवीन व्यावसायिक सौदे करू शकतात. त्यांचा व्यवसाय वाढेल आणि नफा होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन डील होण्याची शक्यता आहे, जे फायद्याचं ठरेल. उद्योगांचा विस्तार होईल. नोकरीत नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील.

वृश्चिक रास (Scorpio)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल अनुकूल ठरू शकते. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. या व्यतिरिक्त कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील . या काळात नोकरदार लोकांना कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदारी मिळू शकते. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायात तुमच्या प्रगतीची शक्यता आहे.

मकर रास (Capricorn)

शनिची प्रत्यक्ष चाल तुमच्यासाठी शुभ ठरू शकते, कारण शनिदेव तुमच्या राशीचा स्वामी आहे. तुमच्या कुंडलीतील धन घरावर शनिदेवाचं थेट आगमन होणार आहे. यावेळी सामाजिक आणि धार्मिक कार्य केल्याने समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल आणि पैशाशी संबंधित समस्याही दूर होतील. त्याचबरोबर व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचा संवाद सुधारेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget