Shani Jayanti 2024 : सनातन धर्मात शनी जयंतीला (Shani Jayanti) विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की, शनी (Shani Dev) प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतात. शनी जयंतीच्या दिवशी शनीची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. यावर्षी शनी जयंती वैशाख महिन्याच्या 8 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे. शनी जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. 


असं म्हणतात की, जे लोक या दिवशी श्रद्धेने शनीची पूजा करतात त्यांची सर्व इच्छा पूर्ण होते. तर, जाणून घेऊयात या दिवशी पूजेच्या साहित्यात नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश असायला हवा. 


शनि जयंती वर्षातून दोनदा साजरी करण्याची परंपरा आहे. काही राज्यांत शनी जयंती वैशाख अमावस्येला साजरी करतात तर काही राज्यांत ती ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. यावर्षी वैशाख अमावस्या 8 मे रोजी आणि ज्येष्ठ अमावस्या 6 जून रोजी आहे. त्यामुळे या दोन दिवशी शनि जयंती साजरी होणार आहे. शनि जयंतीच्या दिवशी जर कोणतीही चूक झाली तर शनिचा कोप होऊ शकतो असं म्हणतात. 


यंदाची शनी जयंती कधी ?


वैशाख अमाावस्या तिथीची सुरुवात 7 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी होणार आहे. तर, 8 मे 2024 रोजी सकाळी 8 वाजून 51 मिनिटांनी ही तिथी समाप्त होणार आहे. त्यानुसार, वैशाख अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 8 मे रोजी शनी जयंती साजरी केली जाईल. 


शनी जयंतीच्या पूजेचं साहित्य


शनी देवाची प्रतिमा 


शनी चालीसा 


शनी कथाचे पुस्तक 


काळ्या किंवा निळ्या रंगाचे वस्त्र


निळ्या रंगाची फुलं


मोहरीचं तेल 


तिळाचं तेल


हवनसाठी लागणारी सामग्री 


हवन कुंड


कापूर


पान


सुपारी


दक्षिणा


आसन 


धूप


दीप


चंदन 


गंध 


जल 


शमीचे पान 


गंगाजल 


फळ मिठाई


भगवान शनीच्या पूजेला 'या' नियमांची काळजी घ्या 



  • सर्वात आधी भगवान शनीदेवाची विधीवत पूजा करा. 

  • पूजेच्या दरम्यान मन शांत ठेवा आणि मनातील नकारात्मक विचार दूर ठेवा. 

  • शनीदेवाला निळा रंग प्रिय आहे. यासाठी शनीला निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. तसेच, फूल यांसारख्या गोष्टी वापरा. 

  • शनी जयंतीच्या दिवशी दान करा. 

  • शनिदेवाच्या महादशेपासून मुक्ती मिळविण्यासाठी या दिवशी विशेष पूजा करा. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Jayanti 2024 : यंदाची शनि जयंती कधी? या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका; शनि देईल कर्माचं फळ, एकामागोमाग येतील संकटं