Shani Jayanti 2022 : ज्योतिष शास्त्रात शनिदेवांना कर्माचे फळ देणारे तसेच न्यायाधिकारीचे स्थान मिळाले आहे. ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतात. ते ज्यांच्यावरही प्रसन्न होतात. त्यांना सर्व सुखसोयी देतात. पण ज्याच्यावर शनिदेवाची वक्रदृष्टी पडते, त्याच्या आयुष्यात अनेक संकटे येतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती काळजी घेते की, कोणत्याही प्रकारे शनिदेवाचा कोप होणार नाही. त्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते विविध उपाय करत राहतात.


ढैय्या आणि साडेसाती सुरू असणाऱ्यांसाठी ही चांगली संधी


पंचांगानुसार, दरवर्षी शनि जयंती (Shani Jayanti 2022) ज्येष्ठ अमावास्येला साजरी केली जाते. यावेळी शनि जयंती 30 मे रोजी आहे. ज्यांच्यावर शनीची ढैय्या आणि साडेसाती सुरू आहेत. त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. त्यांनी शनि जयंतीच्या शुभ मुहूर्तावर हा उत्तम उपाय अवश्य करावा. हे उपाय केल्याने तुम्हाला अनेक शनिदोषांपासून तसेच साडेसातीपासून आराम मिळेल.


शनि जयंती 2022 च्या दिवशी हे उपाय करा -


या वर्षी म्हणजेच 2022 मध्ये शनि जयंतीला शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत विराजमान होणार आहेत. हा विशेष योगायोग 30 वर्षांनंतर घडत आहे. अशा स्थितीत शनीला प्रसन्न करण्यासाठी केलेले हे उत्तम उपाय अनेक पटींनी अधिक परिणाम देतील.


शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करताना ‘ओम शनि शनिश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा आणि शनि चालिसाचा पाठ करावा. अनेक फायदे होतील.


शनि जयंतीच्या दिवशी दान करणे शुभ असते. पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा. त्यानंतर वाटीसह तेल कोणत्याही गरीब आणि गरजू व्यक्तीला दान करा. किंवा शनि मंदिरात ठेवा.


शनि जयंतीच्या दिवशी कोणत्याही शनि मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी. त्यानंतर मोहरीचे तेल, काळे तीळ, काळे उडीद अर्पण करावे.


शनि जयंतीच्या दिवशी कोणत्याही गरीब, असहाय्य, वृद्ध, महिला इत्यादींना मदत करा. यामुळे शनिदेव प्रसन्न होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :