Shani Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2026 हे वर्ष फार महत्त्वाचं असणार आहे. कारण या वर्षात शनि देव (Shani Dev) मीन राशीत संक्रमण करणार आहे. या संपूर्ण वर्षात शनी मार्गी चाल, वक्री चाल करण्याबरोबरच नक्षत्र परिवर्तन देखील करणार आहे. शनिचं गुरुच्या राशीत असल्या कारणाने काही राशींसाठी नवीन वर्ष फार सुखाचं जाणार आहे. नवीन वर्षात शनी मार्गी अवस्थेत असणार आहेत. त्याचबरोबर, 26 जुलै 2026 रोजी याच राशीत वक्री चाल करणार आणि त्यानंतर पुन्हा मार्गी होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचं भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी नवीन वर्ष फार चांगलं असणार आहे. या राशीच्या अकराव्या स्थानी शनि विराजमान होणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. या काळात तुम्हाला विशेष धनलाभ देखील मिळेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्ही या काळात पूर्ण करु शकता. तसेच, अचानक धनलाभ झाल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोतही वाढलेले दिसतील. तुमची आर्थिक स्थिती देखील पूर्वीपेक्षा चांगली असेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

नवीन वर्ष 2026 मध्ये शनि तूळ राशीच्या सहाव्या चरणात असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या काळात शत्रूवर विजय मिळवता येणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. तसेच, या काळात मुलांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला या काळात पूर्ण करता येतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला कमी ताण जाणवेल. नोकरीत तुम्हाला प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे सर्व मार्ग मोकळे होतील. रखडलेले पैसेही मिळतील. 

Continues below advertisement

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी शनिचं संक्रमण फार महत्त्वाचं ठरणार आहे. या राशीच्या लग्न आणि धनसंपत्तीचा स्वामी असून तुमच्या पराक्रमात चांगली वाढ दिसून येईल. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी तुमच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जर तुम्हाला या वर्षात धार्मिक यात्रेसाठी जायचं असल्यास तुम्ही सहज जाऊ शकता. कामाच्या बाबतीत तुम्ही फार प्रामाणिक असाल. भावा-बहिणीतील नातं अधिक घट्ट असेल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 21 December 2025 : आज रविवारच्या 'या' 7 राशींवर असणार सूर्यदेवाची कृपा, विघ्न येण्याआधीच टळेल; वाचा आजचे राशीभविष्य