Horoscope Today 21 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 21 डिसेंबर 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस हा सूर्यदेवाला (Lord Sun) समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. जल अर्पण केलं जातं. तसेच, ग्रहांच्या संक्रमणाच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस 12 राशींसाठी नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today).
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. आज सामाजिक कार्यामध्ये तुमचं योगदान पाहायला मिळेल. तसेच, आजच्या दिवसात तुमच्या हाती नवीन कॉन्ट्रॅक्ट लागू शकतं. त्यामुळे दिवसभर सतर्क राहा. तसेच, कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. नकारात्मक लोकांपासून दूर राहा.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. ज्या कामाची तुम्ही आजपासून सुरुवात करणार आहात ते काम सुरळीतपणे पार पडेल. तसेच, तुमच्या सिनिअर्सकडून तुम्हाला सकारात्मक रिस्पॉन्स मिळेल. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच, आजच्या दिवसात शुभ काम करण्याआधी आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे दार खुले होतील. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. मुलांसाठी आजचा दिवस सुट्टीचा असल्या कारणाने ते आनंदात आजचा दिवस घालवतील. धार्मिक यात्रेला जाण्यासाठी आजचा दिवस शुभकारक आहे. सामाजिक कार्यात तुम्ही जास्त लक्ष द्याल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. तुमच्यापाठी घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा असताना तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन सुखाचे जातील. आज संध्याकाळच्या वेळी पार्टनरला छान भेटवस्तू द्याल. तसेच, तुमचा आत्मविश्वासही वाढेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही दिग्गज लोकांची मदत मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला फार प्रवास करावा लागेल. या दरम्यान अनेक लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. एखाद्या कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कामासाठी तुम्ही इतके दिवस थांबून होता ते काम तुमचं वेळेत पूर्ण होईल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, सामाजत तुमच्या नावाचं कौतुक केलं जाईल. प्रगतीचे अनेक संकेत निर्माण होणार आहेत.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला ना लाभ ना तोटा होईल. पण, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याने अनेकांना रोजगार मिळेल. त्यामुळे व्यवहारात फक्त स्वत:चाच विचार न करता इतरांचा देखील विचार करणं तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईल. मात्र, दिवसाच्या शेवटी तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. भविष्यात तुम्ही प्लॅन केलेल्या योजनांवर याचा परिणाम होऊ शकतो. तसेच, तुमचा आत्मविश्वासही ढासळेल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस फार सामान्य असणार आहे. आज तुम्हाला तुमची अनेक रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्या हाती चांगली बातमी लागेल. लवकरच एखाद्या नवीन कार्याची सुरुवात तुम्ही करु शकता. प्रवासाचे योग आहे. फक्त आळस दूर ठेवा. यश तुमचंच आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीने शेअर बाजारात पैशांची गुंतवणूक करु नये. तुम्हाला धनहानीचे संकेत मिळू शकतात. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. मात्र, त्यात ना लाभ ना तोटा मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस सामान्य आहे. दिवसाची सुरुवात प्रसन्न होईल. पण, जसजसा वेळ निघत जाईल तुम्हाला बैचेन वाटेल. तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतील. 10 गोष्टी डोक्यात सुरु असतील पण उत्तर एकाचंही मिळणार नाही.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमची आर्थिक स्थितीही चांगली आहे. मात्र, तरीही पैशांचा अतिवापर करु नका. महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे व्यवहाराच्या बाबतीत काळजी घ्या. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)