Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व नवग्रहांमध्ये शनीसुद्धा या वर्षी राशी परिवर्तन करणार आहे. सध्या शनी (Shani Dev) आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे. शनी (Lord Shani) 29 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजून 01 मिनिटांनी बृहस्पतीच्या राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, 3 जून 2027 पर्यंत शनी याच राशीत स्थित असणार आहे. या काळात काही राशींच्या लोकांना लाभ मिळेल, तर, काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांना शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागेल. 


मात्र, आपल्याला माहीत आहे की, शनीचं जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो तेव्हा तो काळ अडीच वर्षांचा असतो. तर, संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी शनीला तीस वर्षांचा कालावधी लागतो. या दरम्यान याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांना सहन करावा लागतो. 


ज्योतिष शास्त्रानुसार, ज्या राशीच्या लोकांना शनीच्या साडेसातीचा प्रभाव असतो त्यांच्या जीवनात मानसिक तणाव, आर्थिक चढ-उतार आणि संकटांचा सामना करावा लागतो. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.  


सिंह रास (Leo Horoscope)


शनीच्या साडेसातीचा परिणाम सिंह राशीच्या लोकांवर होणार आहे. या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात अडथळे जाणवतील. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम होऊ शकतो. या काळात तुम्ही जे काही कार्य कराल त्याचे नकारात्मक परिणाम तुम्हाला मिळतील. त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात या काळात करु नका. 


मेष रास (Aries Horoscope)


सिंह राशीप्रमाणेच मेष राशीच्या लोकांना या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. या काळात कोणत्याच शॉर्टकटचा वापर करु नका. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. लहान मुलांच्या बाबतीत कोणतेच मोठे निर्णय घेऊ नका. तसेच, कुठेही पैशांची गुंतवणूक करु नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती खालावेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असण्याची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करु नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:                                  


Horoscope Today 30 January 2025 : आज गुरुवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य