Shani Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, सध्या राहु आणि शनी (Shani Dev) एकमेकांच्या नक्षत्रात विराजमान आहे. या दुर्लभ स्थितीमुळे परिवर्तन राजयोग जुळून आला आहे. यामुळे 3 राशींच्या (Zodiac Signs) लोकांना याचा चांगला लाभ होणार आहे. तसेच, तुम्हाला नशिबाची देखील चांगली साथ मिळणार आहे. 


ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि राहू हे फार शक्तिशाली ग्रहांपैकी एक आहेत. शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी घेतात तर राहू एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी घेतात. यामुळे व्यक्तीच्या जीवनावर होणारा परिणामही दीर्घ काळासाठी असतो. सध्या शनी शतभिषा नक्षत्रात विराजमान आहे. तर, 2025 पर्यंत शनी याच नक्षत्रात असणार आहे. शतभिषा नक्षत्राचा स्वामी राहू आहे. 


राहूने 5 जुलै 2024 रोजी उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला होता. तर, राहू मार्च 2025 पर्यंत याच राशीत असणार आहे. उत्तर भाद्रपदचा स्वामी शनी आहे. अशा प्रकारे शनीचं राहूच्या नक्षत्रात असण्याने परिवर्तन राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगाचा कोणत्या 3 राशींना लाभ होणार आहे ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी परिवर्तन योग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमचं व्यवसायात जे नुकसान झालं होतं. त्याची भरपाई निघून येईल. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. राहुमुळे तुमच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घडून येईल. आणि चांगला धनलाभ मिळेल. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांवर शनी आणि राहूची कृपा असणार आहे.या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुमच्या करिअरमध्ये चांगला बदल दिसून येईल. तसेच, पगारात चांगली वाढ होईल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी हा योग फार शुभ असणार आहे. या काळात तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल अशा दोन्ही लाईफमध्ये चांगला बदल दिसून येईल. परदेशात जाण्याचं तुमचं स्वप्न लवकरच साकार होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नवनवीन संधी मिळतील. एकूणच तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Astrology : आज जुळून आला गुरु पुष्य योगाचा शुभ संयोग, वृश्चिकसह 'या' 5 राशींची लागणार लॉटरी; पदोपदी मिळतील शुभ संकेत