Shani Gochar 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व ग्रहांमध्ये शनि (Shani) हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे. 3 ऑक्टोबर रोजी शनीने (Shani Dev) राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश केला आहे. शनि 27 डिसेंबरपर्यंत याच नक्षत्रात असणार आहेत. शनि वेळोवेळी नक्षत्र परिवर्तन करतो, याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर होतो. शनि आणि राहू कडक ग्रह आहेत, त्यामुळे शनीच्या शतभिषा नक्षत्रातील प्रवेश कोणत्या राशींना भोवणार? जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


या राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती फारच अशुभ ठरणार आहे. शनीच्या नक्षत्र बदलाचा परिणाम तुमच्या कामावर होईल. तुमच्या जीवनात अनेक चढ-उतार येतील, नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये तणावपूर्ण वातावरण असेल. जे लोक व्यापारी, व्यावसायिक आहेत त्यांचं नुकसान होईल. या काळात तुमचं जीवन आव्हानांनी भरलेलं असेल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी येणारा काळ कठीण असणार आहे. तुम्हाला कोणतंही काम करताना फार सतर्क राहावं लागेल. तसेच, आरोग्याशी संबंधित तुम्हाला काही संकटांना सामोरं जावं लागेल. एखाद्या गंभीर आजाराने तुम्ही त्रस्त असू शकता. या काळात पैशांचा वापर देखील जपून करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला आर्थिक चणचण भासू शकते. तसेच, या दरम्यान कोणालाही पैसे देताना सांभाळून. प्रत्येक निर्णय नीट विचारपूर्वक घ्या.


वृश्चिक रास (Scorpio)


शनीचं नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फार आव्हानात्मक असणार आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची साथ मिळणार नाही. तसेच, प्रगतीच्या वाटेवर अडथळे निर्माण होतील. या काळात जर तुम्ही कोणाला वचन दिलं असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. या काळात कुटुंबियांशी तुमचे खटके उडू शकतात.


मकर रास (Capricorn)


या राशीच्या लोकांना शनीच्या नक्षत्र परिवर्तनामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. या काळात तुमचं काही आर्थिक नुकसान होईल, व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक नुकसान होईल. या अडीच महिन्याच्या काळाच त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. या राशीच्या व्यक्तीने यावेळी खूप सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती अशुभ ठरेल. या काळात तुम्हाला अशुभ परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. नोकरी करणाऱ्यांसाठी कठीण काळ असेल, या काळात तुम्ही केलेलं काम बिघडू शकतं आणि यामुळे तुमचे बॉस तुमच्यावर रागवू शकतात. तसेच, यावेळी या काळात तुमच्या कामात काही अडचणी येऊ शकतात.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Shani Gochar 2024 : दिवाळीनंतर 'या' 3 राशींना शनी देणार 'जोर का झटका'; एकामागोमाग लागेल संकटांची रांग